Eknath Shinde: 300 मीटर रस्त्याच्या कामावरून शिंदेंचे शिलेदार आपापसात भिडले, "विकेट पाडण्याची" दिली धमकी!

Latest Kalyan Dombivali News : स्त्याचा निधी वेगळ्याच रस्त्यावर खर्च करत रस्ता करण्यात आल्याचा आरोप समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Eknath Shinde: 300 मीटर रस्त्याच्या कामावरून शिंदेंचे शिलेदार आपापसात भिडले, "विकेट पाडण्याची" दिली धमकी!
Updated on

Latest Dahisar News: नवी मुंबईत समाविष्ट झालेल्या 14 गावातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आपापसात भिडले. दहिसर वालीलकर पाडा या 300 मी रस्त्याच्या कामावरून हे पदाधिकारी हमरीतुमरीवर आले. शिंदे गटातील उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर व माजी कल्याण पंचायत समिती सभापती भरत काळू भोईर यांच्यात वादावादी झाली आहे. रस्ता चोरला असे म्हणत हे पदाधिकारी भिडले असून यातून ज्यांंच्यात हिम्मत असेल तर सामोरे या, आम्हाला त्रास दिला तर त्याची विकेट पाडू, दहिसर ची हिस्ट्री माहीत आहे ना ? अशी धमकीच उपजिल्हा प्रमुख भोईरांनी माजी सभापती भोईर यांना दिली आहे. 

नवी मुंबईत समाविष्ट झालेल्या 14 गाव मधील दहिसर गावातील रस्त्याच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. दहिसर वालिलकर पाडा या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग ( पीडब्ल्यूडी) मार्फत 300 मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या विरोधात शुक्रवारी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. मंजूर रस्त्याचा निधी वेगळ्याच रस्त्यावर खर्च करत रस्ता करण्यात आल्याचा आरोप समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.