Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम

Maharashtra Political News: कुटुंबाला तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करतील.
Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम
Updated on

Latest Shivsena news: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऐतिहासिक यशानंतर आता शिवसेनेकडून ‘लाडकी भेट, कुटुंब भेट’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवसैनिक राज्यात घरोघरी जाऊन या योजनांचा प्रचार करतील.

मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन काही निवडक कुटुंबांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह इतर सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही? तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करतील.

Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम
Eknath Shinde: शिंदे गटातील कट्टर विरोधक आले एकत्र, विधानसभेची नांदी अन् चर्चांना उधाण

समस्या जाणून घेणार

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांच्या समस्या मुख्यमंत्री शिंदे स्वतः ऐकून घेणार आहेत. ‘‘ लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गट अशा दहा आघाडीच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या की नाही? याची माहिती राज्य सरकार घेणार आहे. ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना तो कसा देता येईल? याकडे आम्ही लक्ष देणार आहोत,’’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम
Eknath Khadse on Chandrakant Patil : पाणी योजना आणण्यास 5 वर्षे का लागली? आमदार एकनाथ खडसे

या योजनांचा प्रचार

लाडकी बहीण योजना

लाडकी लेक योजना

वयश्री योजना

युवा कार्य प्रशिक्षण योजना

मोफत अन्नपूर्णा योजना

शेतकऱ्यांची वीजबिल माफी

Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम
Eknath Shinde: महायुतीमध्ये जुंपणार! शिवसेना 120 जागा लढणार; शिंदे गटाने स्पष्ट केल्याने भाजप-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.