Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

भाजपविरोधामुळे कापली हिंगोली, यवतमाळची उमेदवारी | Hingoli, Yavatmal's candidature dropped due to BJP opposition|
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा
Updated on

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने तत्कालीन शिवसेनेच्या विरोधात केलेल्या ऐतिहासिक बंडाने भल्याभल्यांचे धाबे दणाणले होते. (eknath shinde shivsena)

तत्कालीन शिवसेनेच्या १८ पैकी तब्बल १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाची वाट धरली होती. आत्तापर्यंत तब्बल तीन विद्यमान खासदारांना शिंदे यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.(bjp vs shinde loksabha)

यातील हिंगोली, यवतमाळ -वाशिम विद्यमान खासदारांना पक्षांतर्गत संघर्ष व भाजपचा स्थानिक पातळीवरील विरोध व भाजपने केलेले सर्वेक्षण अडचणीचे ठरल्याची माहिती मिळत आहे. मात्र या निर्णयाचा फटका शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.(loksabha election 2024)

Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा
Ekanth Shinde: करिना आणि करिश्मा कपूर करणार शिवसेनेत प्रवेश?

यवतमाळ - वाशीमवर गेली २५ वर्षे ठाण मांडून बसलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला.(bhavna gauli loskabha news)

उमेदवारी का नाकारली गेली, याचा आढावा घेतला असता प्रामुख्याने मतदारसंघातील तब्बल चार भाजप आमदारांनी भावना गवळी यांना उमेदवारीसाठी प्रचंड विरोध असल्याचे समोर आले. त्यातच भाजपचे आमदार मदन येरावार यांनी आणलेल्या ३५० कोटींच्या अमृत योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्याने त्याचा आवाज गवळी यांनी संसदेत उठवला होता.

त्याचाच राग मनात धरून योग्यवेळी भाजप आमदारांनी गवळींच्या उमेदवारीवर टाच आणण्याचे प्रयत्न केले. त्याचबरोबर भावना गवळी यांचे पक्षातील सहकारी मंत्री संजय राठोड यांच्याबरोबरही यवतमाळच्या नेतृत्वावरून वाद असल्याने उमेदवारी न मिळू देण्यामध्ये संजय राठोड यांचीही आडकाठी होती, असे समजते.

Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा
Eknath Shinde: मुख्यमंत्री का आले भाजपच्या दबावाखाली? जाणून घ्या काय आहेत कारणं

त्यामुळेच शिंदे गटाचा अंतर्गत वाद, भाजप नेत्यांचा विरोध, भाजपचे सर्वेक्षण यामुळे गवळी यांची विकेट गेली असल्याची माहिती यवतमाळच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलतांना दिली.

त्याबरोबरच हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाही मतदारसंघातील चार भाजपच्या आमदारांनी प्रचंड विरोध केला होता. मराठा आरक्षणामध्ये दिल्लीला जाऊन आंदोलन करणे, पक्षाच्या विरोधात जाऊन राजीनामा देणे व अंतर्गत सर्वेक्षण, या सर्व गोष्टी उमेदवारी मिळण्यात पाटील यांना अडथळा ठरल्याचे समजते.

या दोन्ही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावरच विरोधकांनी व पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभा करण्यास सुरुवात केली आहे. याचा राजकीय फटाकाही शिंदे यांना बसणार आहे. शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुढच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता हे १३ खासदार व पन्नास आमदार शिंदेंसोबत आले.

Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा
Eknath Shinde: ठाण्याची उमेदवारी स्वपक्षीयालाच द्या; शिंदेंचे पदाधिकारी आक्रमक!

मात्र तीन विद्यमान खासदारांनी तिकिटे कापल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत याचेच पडसाद उमटून उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये पसरली आहे. त्यामुळे यापुढे तरी शिंदे यांनी भाजपच्या दबावाला बळी पडू नये, अशी भूमिका पक्षातील नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना होणारा तोटा ...

१) शिंदे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न

२) शिंदे गट भाजप चालवतात असा विरोधक प्रचार करणार

३) अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता

४) भाजपने लोकसभेला तीनशे पार केल्यास गटाला डावलले जाण्याची भीती.

५) अनेक कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटाकडे फिरण्याची शक्यता .

Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा
Solapur Loksabha : Ram Satpute यांनी रणशिंग फुंकलं,Praniti Shinde यांच्यावर हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.