Ekanth Shinde: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गटाचे संदीप भराडे इच्छुक

Ambernath Assembly Election:
Ekanth Shinde: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गटाचे संदीप भराडे इच्छुक
Updated on

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात गटातटाचे राजकारण रंगले आहे. शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर असे दोन गट सक्रिय आहेत. विधानसभा निवडणुकीत किणीकर यांना उमेदवारी दिल्यास काम न करण्याचा निर्णय वाळेकर यांनी घेतला आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर वाळेकर यांनी आपला पत्ता उघडला आहे.

त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी आमदार’ असा उल्लेख असलेले बॅनर्स शहरात लावले आहेत. शिंदे गटातील गटबाजीचे राजकारण यामुळे उघड झाले असून, अंबरनाथमध्ये कोणाचे पारडे वरचढ ठरते, हे आता पाहावे लागणार आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिंदे गटात शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत. किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचे काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही, अशी ठाम भूमिका वाळेकर गटाने घेतली आहे.

Ekanth Shinde: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गटाचे संदीप भराडे इच्छुक
Ekanth Shinde : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, डीनच्या बदलीचे दिले आदेश!

तसेच उमेदवार बदलून दिल्यास आम्ही मन लावून काम करू आणि उमेदवार निवडून आणू, असा प्रस्तावही वरिष्ठांसमोर वाळेकर गटाने ठेवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, किणीकर हे तीन टर्मचे आमदार आहेत. एवढेच नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांची जवळीक आहे. त्यामुळे त्यांना बदलले जाईल का? हा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाळेकर गटाकडून आमदार किणीकर यांना कायम विरोध होत आला आहे. त्यामुळे किणीकर यांच्याविरोधात कुणाला उभे केले जाणार, याची चर्चा रंगली होती. अखेर शहरप्रमुख वाळेकर यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक ॲड. संदीप भराडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

इतकेच नव्हे, तर भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी ‘भावी आमदार’ असा उल्लेख असलेले बॅनर्सही अंबरनाथ शहरात लावले आहेत. त्यामुळे वाळेकर गट यंदा आमदार किणीकर यांच्याविरोधात संदीप भराडे यांना मैदानात उतरवणार, हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निवडणुकीसाठी भराडे यांचा ठाम निर्धार

२०१९च्या निवडणुकीपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वेळेस त्यांनी पुढच्या निवडणुकीत बघू, असे सांगितले होते. यंदा पुन्हा त्यांची भेट घेतली असता, त्यांनी जो उमेदवार सीट निवडून आणेल, त्याचा विचार होईल. त्यामुळे कामाला लागा, असे आदेश दिल्याचे ॲड. संदीप भराडे यांनी सांगितले. १५ वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेत एकच चेहरा दिला जात असून हा मतदारसंघ राखीव आहे.

मात्र, या मतदारसंघात हवी तशी कामे झालेली नसल्याचे सांगत भराडे यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पक्षाने जर तिकीट दिले नाही, तर वरिष्ठ सहकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून पुढची वाटचाल ठरवू; पण निवडणूक लढवायचीच आहे, असा ठाम निर्धार भराडे यांनी केला आहे.

किणीकरांचा विजयरथ रोखणार?

सगळ्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीत शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा गट उघडपणे आमदार डॉ. किणीकर यांच्याविरोधात काम करणार हे निश्चित आहे. त्यामुळे किणीकर चौथ्यांदा आमदार होतात? की स्वपक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ekanth Shinde: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गटाचे संदीप भराडे इच्छुक
Ekanth Shinde: भाजपकडून मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण सुरु आहे का? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

Ekanth Shinde: करिना आणि करिश्मा कपूर करणार शिवसेनेत प्रवेश?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.