Mumbai: मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या मागाठाणे मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे गेली दोन टर्म निवडून आले होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर येथील राजकीय गणिते बदलली आहेत.
प्रकाश सुर्वेंसमोर ठाकरे गटाच्या उदेश पाटेकर यांचे आव्हान असणार आहे. तर मनसेच्या नयन कदम यांचेही काही अंशी पारडे जड आहे. असे असले तरी या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत पाहायला मिळणार असून मागाठाणेचा गड राखण्याचे प्रकाश सुर्वें समोर आव्हान असणार आहे.