"खडसेंना सन्मानाने राष्ट्रवादीत घेतल्यामुळेच भाजपचा तिळपापड"

"खडसेंना सन्मानाने राष्ट्रवादीत घेतल्यामुळेच भाजपचा तिळपापड" राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजपवर घणाघाती टीका Eknath Khadse ED Inquiry Bhosari Land Scam NCP Jayant Patil slams BJP
Eknathrao Khadse
Eknathrao KhadseEknathrao Khadse
Updated on

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

मुंबई: भाजपमध्ये दीर्घकाळ कार्यरत असणारे एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंची भाजपमध्ये घुसमट केली जात होती. त्यांना राष्ट्रवादीने सन्मानाने प्रवेश दिल्याचे भाजपला पाहावलं नाही. त्यामुळे चिडून जाऊन भाजप आता केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने त्यांना अडकवत आहे", असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. (Eknath Khadse ED Inquiry Bhosari Land Scam NCP Jayant Patil slams BJP)

Eknathrao Khadse
"हिंदूंच्या सणांना नियम, अटी घालणारी जनाबसेना म्हणजे..."

भोसरी येथील भूखंडाबाबत घोटाळा झाल्याबद्दल खडसेंना गुरूवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार खडसे चौकशीला हजर राहिले. याच मुद्द्यावर जयंत पाटील म्हणाले, "एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळे चौकशीतून ते निर्दोष बाहेर येतील. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे."

Eknathrao Khadse
'छोट्या खात्याचा मंत्री' म्हणणाऱ्या राऊतांना राणेंचं उत्तर

"एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे, त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली. त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले", अशा शब्दात त्यांना भाजपवरील राग व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.