विधानसभा अध्यक्षपदाची लगबग, मविआचे मंत्री राज्यपालांच्या भेटीला

विधानसभा अध्यक्षपदाची लगबग, मविआचे मंत्री राज्यपालांच्या भेटीला
Updated on

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागून होतं. अखेर ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेलं आहे. (Bhagat Singh Koshyari) एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि बाळासाहेब थोरात राजभवनवर पोहोचले आहेत.

हिवाळी अधिवेशन सुरू होण्यासाधी अध्यक्षपदाची घोषणा होईल. यासाठी उद्या आणि परवा आवाजी पद्धतीने मतदान पार पडणार आहे. मात्र त्याआधी महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री राज्यपालांच्या (bhagat singh koshyari) भेटीला जाणार आहेत. यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. (MVA minister meets koshyari)

विधानसभा अध्यक्ष (MLA president election) निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपाल आणि सरकारमधील संघर्षावर पडदा पडणार का, याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, राज्यपालांकडून महाविकास आघाडीच्या कामात हस्तक्षेप, हिंगोली, नांदेड, परभणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या बैठका, ओबीसी अध्यादेश वेळी राज्यपालांकडून विचारणा, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमताना अधिकारांची कपात असे अनेक विषयात राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष दिसून आला होता.

विधानसभेच्या अधिवेशनात विधासनभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा नियमात बदल करण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष किंवा उपसभापती यांची निवड अवाजी मतदानानेच केली जाते. विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार सरकारचा, मात्र त्याला राज्यपालांची मान्यता आवश्यक त्यामुळे हा संघर्ष वाढणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.