Eknath Shinde in Kalyan: मुख्यमंत्री येणार... खड्डे बुजविण्यास सुरवात! केडीएमसीचा नेहमीचाच कित्ता

Eknath Shinde: आपला मागचाच कितत्व पालिका प्रशासन वारंवार गिरवीत असल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांकडून टीकेची झोड उठविण्यात आली.
kalyan potholes kdmc
kalyan potholes kdmcesakal
Updated on

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे केडीएमसी आधीच चर्चेत असते. शहरात कोणी मंत्री बडे नेते येणार असतील तर त्यांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती केडीएमसी प्रशासन हाती घेते. शनिवारी देखील केडीएमसीने आपला मागचाच कित्ता गिरविला. फडके मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी भेट देत आहेत. मुख्यमंत्री येण्याच्या 1 - 2 तास आधी पालिकेने त्यांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत रस्ते चकाचक केले. पालिकेच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.

कल्याण पश्चिम येथे एमसीएचआय यांच्या वतीने फडके मैदान येथे प्रॉपर्टी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी या प्रदर्शनास भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा फिक्स होताच, ते शहरात येण्याच्या अवघे एक ते दोन तास आधी पालिका प्रशासनाने ते येण्याच्या मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. डांबर टाकून हे खड्डे पालिका प्रशासनाने बूजविले. आपला मागचाच कितत्व पालिका प्रशासन वारंवार गिरवीत असल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांकडून टीकेची झोड उठविण्यात आली.

kalyan potholes kdmc
CM Eknath Shinde : क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यापूर्वीच्या रस्त्यांची परिस्थिती पाहिली असता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असेच काहीशी अवस्था गेल्या अनेक वर्ष या परिसरात पाहायला मिळाली आहे. या खड्ड्यांवरून राजकीय नेते, कलाकार मंडळी यांच्याकडून टीका करण्यात आली आहे.

kalyan potholes kdmc
Eknath Shinde यांचे शिलेदार Deepak Kesarkar, Uddhav Thackeray यांच्यावर का संतापले?

मात्र रस्त्याची परिस्थिती काही सुधारली नाही. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचा शहरात दौरा असला की प्रशासन त्या त्या मार्गावरील खड्डे केवळ बुजविते. बाकी ठिकाणी परिस्थिती जैसे थे असते. शनिवारी देखील हेच चित्र कल्याण शहरात दिसुन आले.

पालिकेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेताच, केवळ राजकीय नेत्यांना खड्ड्यांचा त्रास होतो का ? सामान्य नागरिकांना होणारा त्रास पालिका प्रशासनाला दिसत नाही का ? असा सवाल नागरिकांनी केडीएमसी कर्मचाऱ्यांना केला.

kalyan potholes kdmc
Eknath Shinde: एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून 35 निवेदने; CM शिंदेंचेही समर्थन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.