Eknath Shinde: शिंदेंच्या ठाण्याचा कचरा येतो 'या' गावात, उभा राहिला डोंगर अन् दूषित वातावरण

Thane Latest Update: याची दुर्गंधी सुटल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे | Villagers are suffering due to the stench of garbage, anger among the citizens.
Eknath Shinde: शिंदेंच्या ठाण्याचा कचरा येतो 'या' गावात, उभा राहिला डोंगर अन् दूषित वातावरण
eknath shinde sakal
Updated on

latest Dombivli News: डायघर येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले असून त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. येथे वीज निर्मिती केली जात आहे की ग्रामस्थांच्या माथी ठाणे शहराचा कचरा मारला जात आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Eknath Shinde: शिंदेंच्या ठाण्याचा कचरा येतो 'या' गावात, उभा राहिला डोंगर अन् दूषित वातावरण
Thane News: लिफ्टमध्ये अडकलेल्या नऊ महिलांची सुखरूप सुटका

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने डायघर येथे कोट्यवधी रुपये खर्च करत कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकप उभारण्यात आला आहे. मात्र काही ना काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक कारण पुढे करत हा प्रकल्प अनेकदा बंदच ठेवलेला असतो असे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. यामुळे याठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. याची दुर्गंधी सुटल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीत गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र ठाणे जिल्हाधिकारी डॉ.अशोक शिनगारे यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला होता. पावसाळी अधिवेशनात मनसे आमदार राजू पाटील यांनी डायघर वासियांच्या प्रश्नाला हात घातला होता. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत प्रकल्प बंद करून प्रभागनिहाय घनकचरा व्यवस्थापन करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

Eknath Shinde: शिंदेंच्या ठाण्याचा कचरा येतो 'या' गावात, उभा राहिला डोंगर अन् दूषित वातावरण
Thane Rain: तानसा नदीला पूर, वज्रेश्वरीची गरम पाण्याची कुंड बुडाली

यानंतर देखील ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार पाटील यांनी डायघर येथील प्रकल्पामधून होणाऱ्या दुर्गंधीची व्यथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यापुढे मांडली होती. त्यानंतर तातडीने या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिलं आहे. मात्र सध्याच्या परिस्थिती नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठाण्याच्या कचऱ्याचा अजून किती मनस्ताप आम्ही सहन करायचा असा प्रश्न डायघर ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

Eknath Shinde: शिंदेंच्या ठाण्याचा कचरा येतो 'या' गावात, उभा राहिला डोंगर अन् दूषित वातावरण
Thane: शिक्षक असावेत तर असे, सुट्टीच्या काळात सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांकडून बनवून घेतले 20 हजार सीड बॉल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com