लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हाच्या समोर १३ जागा आम्ही लढलो. त्यात सात जागांवर विजय मिळवीला आहे. त्यात अप्रचार आणि फसवणुक करूनही उबाठापेक्षा जास्त जागा जिंकल्यामुळे मशालवर धनुष्यबाण भारी पडला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच यावेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हि महायुतीचे उमेदवार चौकार आणि षटकार मारतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.