मुंबई : ‘विधानसभेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. आमचे सरकार फेसबुक लाइव्ह करणारे नाही, घरात बसून काम करणारे नाही. म्हणूनच राज्यातील जनता आमच्या विविध विकास कामांवर समाधानी आहे. त्याचे प्रतिबिंब विधानसभेच्या निकालात दिसेल आणि महायुतीला बहुमत मिळेल, ’असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘साम’ वाहिनीवर सम्राट फडणीस यांच्याशी बोलताना व्यक्त केला.
लाडकी बहिण योजनेला मिळालेले यश, मराठा समाजाला न्याय देण्याचे धोरण, मुंबईसारख्या ठिकाणी थेट लढती यावर भाष्य करताना एकनाथ शिंदे यांनी भाजपचा ‘कटेंगे तो बटेंगे’ हा मुद्दा ध्रुवीकरणाचा नसून एकत्रितरीत्या लढण्याचा आहे, असेही नमूद केले.