Loksabha Election: भाजपचे ‘जिंकू शकाल त्याच जागा मागा’ हे धोरण लक्षात घेत शिवसेना शिंदे गटाने आमची ताकद लक्षात घ्या, असे सांगण्यास सुरुवात केली आहे.
गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम या ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर वक्तव्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत आलेल्या १३ खासदारांना जागा मिळायलाच हव्यात, हे भाजपला कळवण्यात आल्याचे समजते.(bjp shivsena seat sharing News)
आज उद्धव ठाकरेंसमवेत असलेल्या खासदारांच्या मतदारसंघातही धनुष्यबाण याच चिन्हाला मत देण्याची सवय असल्याचे लक्षात घ्या, असा युक्तीवाद पुढे केला जातो आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, दक्षिण मुंबई हे तीन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या मुंबई कोकण या प्रभावक्षेत्रात मोडतात. तेथे युतीमुळे कित्येक निवडणुकीत कमळ हे चिन्हच वापरले गेले नाही. तेथील मतदारांना केवळ धनुष्यबाणावर ठप्पा मारण्याची सवय झाली असल्याने हे मतदारसंघ आम्हाला द्यावेत, असे शिंदे गटाला वाटते.(maharashtra Political News)
राज्यसभेवर निवड झाली असली तरी मिलिंद देवरा यांचा काँग्रेसच्या माध्यमातून दक्षिण मुंबईत असलेला संपर्क मोठा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही गुजराती व्यापारी वस्ती असलेल्या या भाजपसमर्थक मतदारसंघात देवरा यांनी २ लाखांहून अधिक मते घेतली होती.(maharashtra news)
आता शिवसेनेमुळे त्यांना मिळणारी मराठी मते विजयी ठरू शकतात. भाजपकडे या मतदारसंघात सर्वमान्य चेहरा नाही. तसेच भाजपची मते मिळाली तर देवरा जिंकतील, असे सांगितले जाते.
कोकणात नारायण राणे यांच्या कमळापेक्षा आम्हाला संधी द्या, सिद्धेश रामदास कदम जागा जिंकून देऊ शकतात, असाही युक्तिवाद केला जात आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांनीच विकसित केलेला भाग असल्याने तेथे भाजपने शिरू नये.(eknath shidne news )
प्रताप सरनाईक किंवा माजी महापौर नरेश म्हस्के यांचा चेहरा विजयासाठी जास्त आश्वासक असल्याचे गणितही मांडून दाखवले जाते आहे. म्हस्के यांचे महत्त्व भाजपच्या नेत्यांना कळते.
त्यामुळे जागा जिंकणे हा निकष येथे लागू होतो, असेही सांगितले जाते आहे. धाराशिव या ठाकरे गटाचे ओमराजे खासदार असलेल्या मतदारसंघात शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील धनंजय यांना उमेदवारी द्या, असे सांगणे सुरू आहे. परभणी वगळता शिंदेसेनेने धनुष्यावर जिंकलेल्या प्रत्येक जागेवर हक्क सांगितला आहे.(ekanth shinde vs Bjp maharashtra politics)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.