Eknath Shinde: 400 पारच्या नाऱ्यामुळे गडबड झाली, कांदा सोयाबीनचा फटका बसला; CM एकनाथ शिंदेंचे सूर बदलले?

Eknath Shinde: लवकर केंद्रीय कृषिमंत्र्यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
eknath shinde
eknath shinde esakal
Updated on

भाजपचे ट्रम्प कार्ड तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरले. मात्र, भाजपला स्वबळावर बहुमत देण्यात मोदी जादू अपयशी ठरली. याचा परिणाम म्हणजे तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या नरेंद्र मोदींसाठी घटक पक्षांच्या पाठिंब्याने आपले सरकार चालवण्याची ही पहिलीच संधी आहे. भाजपने यावेळी लोकसभा प्रचारात 400 पारचा नारा दिला होता. मात्र त्यांना 300 चा आकडा देखील गाठता आला नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

चुकीचे नरेटिव्ह सेट करण्यात आले. संविधान बदलण्याचा विरोधकांनी अपप्रचार केला. तसेच 400 पारच्या नाऱ्यामुळे लोकांना गडबड होणार असं वाटलं. त्यामुळे आम्हाला निवडणुकीत फटका बसला अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच कांदा, कापूस, सोयाबीनमुळे निवडणुकीत फटका बसला, असं देखील शिंदे मान्य केलं.

शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्र्यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेलं काम आम्ही पाहिलं आहे. गेल्या 60 वर्षात दे जे निर्णय झाले नाहीत ते मोदींनी घेतले. मात्र नरेटिव्ह सेट करताना आम्हाला काही ठिकाणी त्रास झाला, असे शिंदे म्हणाले.

eknath shinde
Lok Sabha Special Session: लोकसभेचं २४ जूनपासून विशेष अधिवेशन, लोकसभा अध्यक्षांची होणार निवड

नाशिक भागात कांदा प्रश्न आणि विदर्भात सोयाबिन आणि कपाशीमुळे निवडणुकीत फटका बसला, याबाब केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भारत आघाडीने 30 लोकसभा जागा जिंकल्या आहेत, तर महायुतीला राज्यात लोकसभेच्या केवळ 17 जागा मिळाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या 13 जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 9 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या आहेत.

eknath shinde
CM Eknath Shinde: इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका; CM शिंदेंच्या खासदारांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.