Tembhi Naka Thane : रश्मी ठाकरे मंडपात येताच शिंदे गटाने पंखे, कुलर बंद केले, ठाकरे गटाचा आरोप

Rashmi Thackeray
Rashmi ThackeraySakal
Published on

Shinde vs Thackeray Thane : टेंभी नाका येथील प्रसिद्ध दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येऊन रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार ‘स्त्री’ शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही दर वर्षीप्रमाणे त्यांनी देवीचे दर्शन घेतले. या वेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या हजर होत्या.

रश्मी ठाकरे दुर्गेश्वरीच्या दरबारात येताच सुरू असलेले कुलर, पंखे, साऊंड सिस्टीम अचानक बंद झाले. हा सर्व प्रकार शिंदे गटाने मुद्दाम घडवला असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्री उत्सवाला गेली ४८ वर्षे ठाकरे कुटुंबीय हजेरी लावत आहेत. हीच प्रथा शिवसेनेत फूट पडल्यानंतरही कायम आहे. त्याला आता शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गतवर्षीही रश्मी ठाकरे यांनी शारदीय नवरात्रोत्सवात हजेरी लावत टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले होते.

त्या वेळी दोन्ही गटांत जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. यामध्ये ठाकरे गटाचे पारडे जड होते. तोच माहोल यावर्षी पाहायला मिळाला. रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल होताच त्यांनी प्रथम आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर टेंभीनाका येथे दुर्गेश्वरीची आरती केली. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आदी पदाधिकारी उपस्थित होते. येथे देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग, चंदनवाडी शाखा येथेही देवीचे दर्शन घेतले. हजारोंच्या संख्येने महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. ही गर्दी स्थानिक ठाणेकर महिलांची नसून मुंबईहून गाडी भरून आणली असल्याचा आरोप शिंदे गटाने केला.

Rashmi Thackeray
Rashmi Thackeray : बालेकिल्ल्याच्या डागडुजीसाठी रश्मी ठाकरे मैदानात! महिना अखेरीस महिला मेळावा

रश्मी ठाकरे येणार असल्याचे कळताच ठाण्यातील सर्वच मुख्य पदाधिकाऱ्यां‍नी मंडपातून काढता पाय घेतला. शिंदे गटाने पंखे, कुलर बंद केले. यावरून ते किती कोत्या मनाचे आहेत, असा आरोप ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी केला. कितीही खोटेपणाने वागलात आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात, तरी तो दाबला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल झाल्या असताना त्यांच्या निकटवर्तीय पदाधिकारी मीना कांबळे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून शिंदे गटाच्या ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी टोला लगावला. रश्मी ठाकरे ठाण्यात बाहेरच्या महिला घेऊन आल्या. आरती सकाळी आणि संध्याकाळी होत असताना त्यांनी दुपारी आरती केली. त्यामुळे देवी आम्हालाच पावली, अशी खोचक टीका त्यांनी केली.

Rashmi Thackeray
Rashmi Thackeray : शिंदेंच्या बंडानंतर प्रथमच रश्मी ठाकरे कल्याणमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.