आधी फाशीची मागणी करणारेच आता आरोपीची बाजू घेत आहेत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कान टोचले

Badlapur Case: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला आहे. यानंतर या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
cm eknath shinde
cm eknath shindeSakal
Updated on

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर विरोधकांनी तिखट भूमिका घेतली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा विरोधकांनी ही संपूर्ण चकमक सत्ताधारी पक्षाचे कारस्थान असल्याचे म्हटले. विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली की या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. यावर आता मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूर घटनेतील आरोपीचा मृत्यू झाला आहे. त्याचे जेलमधून स्थलांतरण करत असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली. यानंतर पोलिसांनी आत्मरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र आता विरोधक आता राजकारण करत आहेत. चौकशीची मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र आता त्याच्या मृत्यूनंतर सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे चुकीचं आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असं ते म्हणाले आहेत.

cm eknath shinde
Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, या घटनेत एक पोलीस जखमी आहे. मात्र आता पोलिसांवर असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. पोलिसांचं काहीच देणघेणं या विरोधीपक्षाला नाही. पोलिसांबद्दल आक्षेप घेण निंदाजनक आहे. पोलिसांनी जी कारवाई केली त्याचा तपास करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, अक्षय शिंदेच्या गोळीबाराची ही घटना कशी घडली? जेव्हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. ते म्हणाले की, अक्षयला पिस्तूल कुठून आणि कशी मिळाली? आपले पोलीस इतके बेफिकीर आहेत का की कोणी त्यांच्याकडून पिस्तुल हिसकावून घेऊ शकेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.