Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं टेंशन वाढणार? ठाण्यातील या ५ जागांवर भाजपने केला दावा

Shinde Shivsena: असे दावे आम्हालाही करता येतात मात्र हे म्हणजे युतीत मिठाचा खडा टाकणे आहे असे म्हणत भाजपला टोला हाणला आहे
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं टेंशन वाढणार? ठाण्यातील या ५ जागांवर भाजपने केला दावा
Updated on

Thane Vidhansabha: विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील 288 जागांवर निवडणूक लढली पाहिजे असे विधान करत राजकीय वातावरण रंगविण्यास सुरवात केली आहे. यामुळे महायुती मधील पदाधिकाऱ्यामध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील 5 विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी भाजपने सुरू केली असून तशी मागणी केली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाने असे दावे आम्हालाही करता येतात मात्र हे म्हणजे युतीत मिठाचा खडा टाकणे आहे असे म्हणत भाजपला टोला हाणला आहे. तर ठाकरे गटाने माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं अशी भाजपची नीती आहे असे म्हणत

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. खासदार नारायण राणे यांनी भाजपने थेट राज्यातील विधानसभेच्या 288 जागांवर लढलं पाहिजे, असं म्हटलं असून त्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना हे राणे यांचे मत आहे, भाजपचे मत नाही. महायुतीमध्ये जर भाजप 288 जागा लढणार तर महायुती कशाला आहे असे म्हटले होते.

त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, अंबरनाथ आणि कल्याण ग्रामीण यांसह 5 विधानसभा जागा लढविण्याची तयारी असून त्या जागा मिळाव्या अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. येथे बंडखोरी होणार नाही

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं टेंशन वाढणार? ठाण्यातील या ५ जागांवर भाजपने केला दावा
राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा पदाचा राजीनामा

भाजप पदाधिकाऱ्यांच्या या व्यक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर, झोड घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच आमच्याकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे लोकसभेतील निकाल बघता त्यांना लोकसभेमध्ये जो लीड मिळाला आहे.

तो निर्णय आल्यानंतर आमच्या देखील पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत की ज्या सीट अनेक वर्ष भाजपा लढते आहे, त्या सेनेला मिळाव्या. आणि भाजपच्या काही सीटवर शिवसेनेने लढावे अशी आमच्याही लोकांची इच्छा आहे. हा सर्व निर्णय आमचे वरिष्ठ पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हे घेतील. परंतु आता आम्ही युतीमध्ये लढतो आणि युतीमध्ये वाटाघाटी मध्ये ज्या जागा ज्या पक्षाला लढायला मिळतील त्यांनी त्या लढाव्या. आता या सीटवर आम्हाला लढायचे आहे, त्या सीटवर पण आम्हाला लढायचे आहे, तसा दावा आम्हाला देखील करता येतो. परंतु युतीमध्ये असे दावे प्रतिदावे करणे मला वाटत नाही संयुक्तिक ठरेल असे म्हात्रे यांनी सांगितले..

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं टेंशन वाढणार? ठाण्यातील या ५ जागांवर भाजपने केला दावा
Jalgaon News : प्रहार जनशक्ती विधानसभेच्या दोन जागा लढविणार; जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांची माहिती

यावरच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ म्हणाले की, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं अशी भाजपची परिस्थिती आहे. आणि त्यांची नीती आहे. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण आत्ताच लोकसभे बरोबर दोन राज्याच्या विधानसभा झाल्या. एक ओरिसा एक आंध्र प्रदेश ज्या पक्षांनी मागच्या काळात त्यांना संभाळले, त्या दोन्ही पक्षांना या विधानसभेमध्ये संपून टाकले, भाजपची ही निती आहे. मित्र पक्षाला बरोबर घ्यायचं गरजेपुरतं आणि नंतर संपवायचं, असे सांगत भाजपला टोला हाणला आहे.

त्यामुळे येत्या काळात या पाचही विधानसभेच्या जागा कोण लढवत हे पहावे लागेल.

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं टेंशन वाढणार? ठाण्यातील या ५ जागांवर भाजपने केला दावा
Thane News: बारवी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोघेजण गेले वाहून; जिल्हा प्रशासनाकडून शोधकार्य सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.