Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेले आदिवासी आमदार चार तास वेटींगवर असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर भेटीसाठी वेळ दिली होती. मात्र ६.४५ झाले तरी मुख्यमंत्री त्यांची वाट बघणाऱ्या आदिवासी आमदारांना भेटले नाही.
६.४५ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री सह्याद्री अतिथी गृहात येणार नसल्याचं समजलं. मुख्यमंत्री वेळ देत नसल्यामुळे त्यांना भेटायला आलेले आदिवासी आमदार नाराज झाले आहेत. आदिवासी समाजातील आमदार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आले आहेत. पेसा कायद्यांतर्गत 17 संवर्गातील पदनियुक्ती यावर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी हे नेते आले आहेत. या भरतीची परीक्षा झाली असून उमेदवारांची निवडसुद्धा झाली आहे. मात्र अजूनही हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
१७ संवर्गातील पेसा पदभरती मधील 7500 ते 8000 पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया गेल्या एक वर्षापासून रखडली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसताना 13 ऑक्टोबर 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रकानुसार नियुक्त्या थांबवल्या आहेत. या नियुक्त्या त्वरित कराव्यात अशी आदिवासी आमदारांची मागणी आहे.
आमदार नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
आमदार डॉ. किरण लहामटे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
आमदार सुनील भुसारा - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
आमदार राजकुमार पटेल - अपक्ष (प्रहार)
खासदार हेमंत सावरा - भाजपा
सुनील भुसारा यांनी यासंदर्भात म्हटलंय की, आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतली होती. आम्हांला तीनची वेळ दिली होती पण आता ८ वाजले. सीएम साहेब इकडे आलेच नाहीत. त्यांनी इकडचा दौरा रद्द केला.पुढची स्टेप आम्ही ठरवणार आहोत. आमदार खासदारांना लोकप्रतिनिधींना अश्या लोकांना वेळ मिळाली असून भेट होत नाही तर सर्व सामान्य माणूस कसा भेटत असेल हा प्रश्न आम्हांला पडला आहे. झिरवाळ साहेब उपाध्यक्ष आहेत. त्यांनी बोलवलं तर मुख्यमंत्र्यांनी यायचं हा प्रोटोकॉल आहे पण झिरवाळ साहेब आमचे साधे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.