डोंबिवली - इलेक्शन कमिशन आमच्या बॅगा तपासतात मग त्यांची बॅग तपासली तर त्यात काय फरक पडला. त्या बॅगेत अस काय घबाड होत? दोन दिवस झाले नुसती रडारड सुरू आहे आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली. माझी पण दोनदा बॅग तपासली होती, मी त्याचा बाऊ केला नाही..आता यांच्याकडे काहीच विषय उरले नाही म्हणून ही रडारड सुरु आहे. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर रडणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे उभे रहा, असे आवाहन फडणवीस यांनी जनतेला केले.कल्याण पूर्वेत महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे पोटे मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, गोवाचे मंत्री सुभाष फलदेसाई, डॉ. जगन्नाथ शिंदे, कल्याण पूर्वेच्या भाजपा उमेदवार सुलभा गायकवाड, अभिमन्यू गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते..उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बॅगा तपासल्या तर काय वाईट झाले? त्याचा एवढा इशु करण्याचे कारण नव्हते. प्रचारादरम्यान आपली बॅगही निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली असून आम्ही अजिबात रडारड केली नाही. परंतु आता त्यांच्याजवळचे सर्व विषय संपल्यानेच रडारड करून मत मागायचे काम सुरू आहे.तर उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आपला महाराष्ट्र हा सातत्याने पुढे जातो आहे पण काही लोकांना ते सहन होत नाही. या महाराष्ट्राला बदनाम करतात पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आपला महायुतीचा सरकार त्रिमूर्ती आहे. हा त्रिशूल महाराष्ट्राला पुढे नेणारा त्रिशूल आहे..आम्ही तिघांनी हा भरोसा महाराष्ट्राला दिला आहे. आपल्या सोबत आपले मित्र पक्ष आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केला एक असा महाराष्ट्र घडवण्याचा की ज्या महाराष्ट्रामध्ये विकास हा केंद्रस्थानी असेल आणि देशातल्या प्रत्येक राज्याला हेवा वाटेल आणि प्रत्येक राज्यातल्या नागरिकाला हेवा वाटेल की माझं राज्य हे महाराष्ट्रासारखं का नाही.असा महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आपण करणार आहोत आणि म्हणून रडणारे नाही लढणारे आपल्याला हवे आहेत. लढणारे तुमच्यासमोर आहेत. रडणारे रोज रडतात त्यांना मागे राहू द्या आणि लढणाऱ्या सोबत उभे रहा असे आवाहन त्यांनी केले..या महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्राची उद्योग क्षेत्रात अधोगती सुरू होती. मात्र आपले सरकार आले आणि कर्नाटक, गुजरात यांच्यापेक्षा महाराष्ट्र उद्योग गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आला. यावर्षी तर एकूण गुंतवणुकीच्या 52 टक्के गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणली.लाडकी बहीण सुलभा यांच्या विजयाची हा देवाभाऊ गॅरंटी घेतो असे त्यांनी सांगितले. एकदा त्यांना निवडून संधी द्या. कल्याण पूर्वेला एक आदर्श मतदार संघ करण्याचे काम आम्ही करणार. सुलभा गायकवाड यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार असे देखील ते म्हणाले..मार्केट मध्ये सावत्र भाऊ फिरत आहेतलाडकी बहीण योजनेला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केलेला विरोध आणि याच योजनेवरून होत असलेला राजकीय प्रचार यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सावत्र भावाची उपमा देत मार्केट मध्ये सावत्र भाऊ फिरत आहेत हे लक्षात ठेवा.आम्ही तुमचे सख्खे भाऊ असून ही योजना पुढे पण सुरू ठेवू असे म्हणत लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा पुन्हा हे सरकार आल्यानंतर पंधराशे नाही तर 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जाणार आहे. त्यासाठी आमची लाडकी बहीण सुलभा गायकवाड यांना निवडून विधानसभेवर पाठवा असे ते म्हणाले..लाडकी कन्या योजनेत भविष्यात वाढीव निधी देण्यासाठी तुमचा लाडका मामा मंत्रालयात बसलेला आहे असे देखील ते म्हणाले.लाडकी बहीण योजनेचा लाभ साऱ्यांना होत असताना आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी उमेदवार सुलभा गायकवाड यांनी खास आपल्या आगरी भाषेत लाडक्या नंदा, भावजयीना पाठीशी उभे राहण्याची साद घातली.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.