डोंबिवली - राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून सात उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचेही मत मोलाचे ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाणे मधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार असा सवाल राज्यकीय वर्तुळात आहे.याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी राज साहेब जो आदेश देतील तो असे बोलत सध्या अधिक बोलणे टाळले आहे.
मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप - मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत, असे असेल तरी कल्याण लोकसभेचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे दिसून आले आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला खिंडार पाडली आहे. राज्यात केडीएमसी ही एकमेव पालिका होती, जिथे दोन आकडी नगरसेवक मनसेचे होते.दरम्यान महापालिका निवडणुक जवळ आली असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपला त्या मताची आशा आहे. दरम्यान याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी राज साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल असे सांगितले. यामुळे आता राज यांच्या आदेशानुसार च सूत्र हलणार असल्याचे स्पष्ट झाले असून ते काय निर्णय घेतात हे पाहणे औतूसक्याचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.