कोकणचा... प्रवास होणार सुखकर; झालीये 'ही' चाचणी

कोकणचा... प्रवास होणार सुखकर; झालीये 'ही' चाचणी
कोकणचा... प्रवास होणार सुखकर; झालीये 'ही' चाचणी
Updated on

नवी मुंबई : वायु आणि ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा याकरिता कोकण रेल्वेवर सुरू असणारे विद्युतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून कोकण रेल्वेवर विद्युत इंजिनाची पहिली यशस्वी चाचणी सोमवारी घेण्यात आली. उड्डपी ते थोकूर या रेल्वे स्थानकांदरम्यान ४६ किलोमीटर मार्गावर ही चाचणी घेण्यात आली.

महामुंबई आणि कोकणला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कोकण रेल्वेकडे पाहिले जाते. दुर्गम भागातून आडवळणे घेत जाणाऱ्या या कोकण रेल्वेवर डिझेलवर चालणारे इंजिन धावते, त्यामुळे इंजिनातून ध्वनी आणि धुरामुळे वायुप्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. तसेच नेहमी होत असलेल्या इंधन दरवाढीला रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांमधून सुटका होण्यासाठी कोकण रेल्वे मार्गाचे पूर्णपणे विद्युतीकरण करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. रोहा ते थोकूर या ७४० किलोमीटर रेल्वे मार्गावर ११०० कोटी रुपये खर्च करून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ४३ टक्के पूर्ण झाले आहे. उड्डपी ते थोकूर या रेल्वे स्थानकांदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, रेल्वेतर्फे सोमवारी या मार्गावर विद्युत इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आली. 

४६ किलोमीटरवर पहिल्यांदाच विजेवरील लोको इंजिन चालवण्यात रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यश आले. कोकण रेल्वेवर ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता पुढील काळातही विद्युत इंजिनाच्या साह्याने एक्‍स्प्रेस गाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर २०२० पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याने ही चाचणी घेण्यात आली होती. यापुर्वी कोकण रेल्वेवर प्रशासनाकडून केवळ डिझेल इंजिनद्वारे वाहतूक सुरू होती. मात्र, आता विद्युत इंजिनामुळे प्रशासनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. 

विद्युतीकरणामुळे वर्षाला कोट्यवधींची बचत 
कोकण रेल्वेवर दिवसाला ५० गाड्या चालवल्या जातात. मात्र या सर्व गाड्या डिझेल इंधनावर धावणाऱ्या असल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला वर्षाला कोट्यवधी रूपयांचा खर्च येतो. परंतू कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाची वर्षाला शंभर कोटी रूपयांची बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.