CET: शिक्षण विभाग तोंडघशी, न्यायालयाने केली सीईटी रद्द !

शिक्षणमंत्री म्हणाल्या, निकाल पाहून भूमिका ठरवू
minister Varsha Gaikwad
minister Varsha Gaikwadsakal media
Updated on

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (college) अकरावी प्रवेशासाठी (eleventh admission) सीईटी (CET) घेण्याचा अट्टाहास करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाला मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) चांगलीच चपराक देत, ही सीईटी रद्द (CET cancel) करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग तोंडघशी पडला आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी न्यायालयाचे निकालपत्र वाचून आम्ही पुढील भूमिका ठरविणार असल्याचे सांगत आपला बचाव केला.

राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक यांच्या मताचा विचार न करता शालेय शिक्षण विभागाने ही अकरावीची सीईटी विद्यार्थ्यांवर थोपावली होती, असे सांगत राज्यातील पालक, विद्यार्थी संघटनाच्या प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे सीईटी घेण्यासाठी आपला अट्टाहास कायम ठेवलेल्या शिक्षण विभागाची या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. अकरावी सीईटीसाठी राज्यभरातून तब्बल एकूण 10 लाख 98 हजार 318 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी शुल्क भरले आहे, हे शुल्काचे काय होणार असा प्रश्न आता विद्यार्थी पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

minister Varsha Gaikwad
मासळी बाजारावर महापालिकेचा हातोडा ; नोटीस न देता कारवाई झाल्याचा आरोप

''राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी सीईटी ही परीक्षा घेतली जाऊ नये, यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, यांच्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांनी असंख्य वेळा मागणी केली होती. सोशल मीडियावर यासाठी मोहीम ही चालवली होती, मात्र त्यानंतर विभागाने ऐकले नसल्याने आता न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणती चूक न करता अकरावी प्रवेशासाठी पुढील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी''.

- अनुभा सहाय, इंडिया वाइड परेंट असोसिएशन

''राज्य शिक्षण मंडळाने दहावीत ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले त्याच मेरिट वर अकरावीचे शासकीय आदेशानुसार ऑनलाईन प्रवेश सुरू केले जावेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची चुक केली तर यात खूप वेळ जाईल आणि त्यातून अकरावीचे प्रवेश लांबणीवर पडतील. त्यामुळे सीईटीच्या बाबत पुन्हा अट्टाहास करू नये''.

- वैशाली बाफना, सिस्कॉम, शिक्षण प्रमुख

minister Varsha Gaikwad
१५ ऑगस्टला चित्रनगरीत हजारो कामगारांचे सरकार विरोधात आंदोलन

अकरावी प्रवेशासाठी आता ऑनलाईनचाच पर्याय

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द केल्याने आता या प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन प्रवेशाचाच पर्याय उरला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आता अडचणीत आणण्यापेक्षा मागील वर्षांपर्यंत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश केले जावेत, असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात, तर उर्वरित राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयात हे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने केले जातात, त्यात आता कोणताही बदल न करता हे प्रवेश करावेत असे मतही व्यक्त केले जात आहेत.

गुणवत्तेनुसार अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात, यंदा दहावीत मोठ्या प्रमाणात गुण मिळाले असल्याने शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने प्रवेश केले जावेत असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ राजेंद्र धारणकर यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.