तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर १६ फेब्रुवारीला सुनावणी

Anand Teltumbde
Anand Teltumbdesakal media
Updated on

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील (Elgar parishad case) आरोपी आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांनी उच्च न्यायालयात (Mumbai high court) जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आपल्या वृद्ध आईला भेटण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील जामीन (temporary bail demand) देण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाने त्यावर १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

Anand Teltumbde
विधिमंडळ अधिवेशनात ‘जीटीएस’ प्रकरण गाजणार

शुक्रवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. सत्र न्यायालयाने तेलतुंबडेंचा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने फेटाळून लावला आहे. तेलतुंबडेंच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यातच त्यांचा भाऊ मिलिंद तेलतुंबडे याचाही सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला आहे.

त्यांची आई ९२ वर्षांच्या वयोवृद्ध आहेत. त्यामुळे तेलतुंबडेंना आई आणि इतर कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवायचा आहे, अशी विनंती ॲड. देसाई यांनी खंडपीठाकडे केली. त्यांच्या अर्जाला एनआयएकडून प्रतिज्ञापत्रामार्फत विरोध करण्यात आला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खटल्याचा युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. तो मान्य करत खंडपीठाने सुनावणी १६ फेब्रुवारीला निश्चित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.