रोना विल्सन यांच्या मोबाईलमध्ये होते पेगॅसस; नव्‍या फॉरेन्सिक अहवालातील माहिती

Rona Wilson
Rona Wilsonsakal media
Updated on

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील (Elgar Parishad case) आरोपी रोना विल्सन Accused Rona Wilson) यांना अटक होण्याच्या एक वर्षापूर्वी त्यांच्या मोबाईलमध्ये पेगॅसस स्पायवेअर (Pegasus Spyware in mobile) टाकण्यात आले होते. याबाबतची माहिती नव्या फॉरेन्सिक अहवालातून (New forensic report) समोर आली आहे. २०१८ मध्ये विल्सन यांना अटक करण्यात आली होती.

Rona Wilson
नवीन वर्षात लोकलमध्ये वाय-फाय सुविधा; १६५ लोकलमधील ३,४६५ डब्यांत सेवा

डिजिटल फॉरेन्सिक कंपनी आर्सेनल कन्सल्टिंगने सादर केलेल्या अहवालातील माहितीनुसार, इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीच्या एका क्लायंटकडून विल्सन यांचा मोबाईल केवळ देखरेखीसाठी नव्हे, तर हॅकही करण्यात आला होता. विल्सन यांच्या मोबाईलमध्ये पेगॅसस स्पायवेअर आढळल्याचे डिजिटल पुरावे या कंपनीला मिळाले आहेत.

विल्सन यांच्या मोबाईलमध्ये जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ दरम्यान ४९ वेळा पेगॅससद्वारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच अनेक वेळा मोबाईल हॅकदेखील करण्यात आले होते. २०१६ ते २०१८ दरम्यान विल्सन यांचा संगणकही हॅक करून त्यात काही आक्षेपार्ह फाईल्स टाकण्यात आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.