मुंबई : ‘हम कागज नही दिखाएंगे, हम कागज नही दिखाएंगे...’ या कवितेतील ओळींचा जयघोषांनी शुक्रवारी आझाद मैदान दुमदुमले. निमित्त होते सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय जनगणना अभियाना विरोधात जॉईंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस महाराष्ट्रने आयोजित केलेल्या इन्कलाब मोर्चाचे.. यावेळी ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद, अभिनेत्री स्वरा भास्कर, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह विद्यार्थी, दलित आणि मुस्लिम संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी मिळणार पण कंडीशन्स अप्लाय
‘जेएनयू’चा बोलताना उमर खालिद म्हणाला की, देशातील लोकांचे संविधानावर किती प्रेम आहे हे आम्ही आंदोलनातून दाखवून दिले आहे. मात्र, त्याची दखल घ्यायला सरकार तयार नाही. लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. धर्माच्या नावावर आपआपसात लढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आम्ही मात्र भारतीय बनून त्याचा विरोध करणार. उत्तर प्रदेशात सरकारची गुंडगिरी सुरू आहे. तिथे विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांने केला. गृहमंत्री अमित शहा संसदेत ९ वेळा सीएए, एनपीआर, एनआरसी आणणार असल्याचे सांगतात आणि पंतप्रधान असे काहीही नसल्याचे सांगतात. त्यामुळे खरे-खोटे काय हे देशाला कळाला पाहिजे, अशी मागणी त्याने केली.
हे देखील वाचा टक्केवारीच्या '...या' खेळात नवी मुंबईकर वेठीस!
माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील यांनीही यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. मोदी-शहा हे ‘आरएसएस’चे दलाल आहेत. त्यांची विचारधारा लोकांवर लादून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही.
सीएसएमटी परिसराला पोलिस छावणीचे रूप
आझाद मैदानातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सीएसएमटी रेल्वेस्थानक, महापालिकेजवळ कडेकोट बंदोबस्त होता. मुंबई पोलिसांसह राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथकही तैनात ठेवण्यात आले होते.
आंदोलकांवर ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच
आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी गर्दी केली होती. अशावेळी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेराची व्यवस्था केली होती. आंदोलन सुरू असतांना पोलिसांचा हा ड्रोन कॅमेरा आझाद मैदानात घिरट्या घालत होता.
सरकार लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी नवनवीन डाव खेळत आहे. त्यांनी आता सीएए आणि एनआरसी सारखी नवी जनावरे लोकांवर सोडली आहेत. भाजप सरकारने लादलेल्या या कायद्याचा त्रास केवळ मुस्लिमांना नाही तर सर्वांनाच होणार आहे.
- स्वरा भास्कर, अभिनेत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.