'हिम्मत नाही सोडली', कॅप्टनने सांगितला मुंबईतील बेली लँडिंगचा थरार

माझ्या फ्लाईंग करीअरमध्ये मी कधीही उड्डाण करताना विमानाचं चाक निखळून पडल्याचं ऐकलं नव्हतं.
कॅप्टन केशरी सिंह
कॅप्टन केशरी सिंह
Updated on

मुंबई: CISF च्या कॉन्स्टेबलने वेळीच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) सूचित केल्याने गुरुवारी रात्री बीचक्राफ्ट C90 एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा मोठा अपघात टळला, असे या विमानाचे वैमानिक कॅप्टन केशरी सिंह यांनी सांगितले. बीचक्राफ्ट C90 एअर अ‍ॅम्ब्युलन्सने गुरुवारी रात्री मुंबईला येण्यासाठी उड्डाण केले, त्यावेळी नागपूर विमानतळावर (nagpur airport) एक चाक निखळून पडलं होतं. हा प्रकार लक्षात येताच CISF च्या कॉन्स्टेबलने लगेच ATC ला याची माहिती दिली. त्यानंतर मुंबई विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यात आले. (Emergency landing at Mumbai airport In my career never heard of aircraft wheel falling off says pilot)

पश्चिम बंगालच्या बागडोग्रा विमानतळावरुन या एअर अ‍ॅम्ब्युलन्सने उड्डाण केलं होतं. मुंबईला जाताना हे विमान नागपूर येथे इंधन भरण्यासाठी उतरले होते. दोन क्रू मेंबर, एक रुग्ण, एक नातेवाईक आणि डॉक्टर या विमानामध्ये होते.

कॅप्टन केशरी सिंह
बदलापूरमध्ये आजपासून कडक लॉकडाउन

"आम्ही दुर्गापूरवरुन नागपूरला चाललो होतो. नागपूरला आम्ही इंधन भरण्यासाठी थांबलो होतो. आम्ही संध्याकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी नागपूर विमानतळावरुन उड्डाण केले. त्यावेळी CISF च्या कॉन्स्टेबलने चाख निखळून पडल्याचे पाहिले, त्यांनी लगेच वरिष्ठांना या बद्दल कळवले. नागपूरपासून ९० नॉटिकल मैल अंतरावर असताना ATC ने संपर्क साधला व सर्वकाही सुरळीत आहे का? या बद्दल विचारले. मी सिस्टिम चेक केली व सर्व व्यवस्थित असल्याचे उत्तर दिले. त्यावेळी ATC ने विमानाचे चाक विमानतळावर निखळून पडल्याचे सांगितले. नागपूरपासून १५० नॉटिकल माइल्स अंतरावर असताना माझा ATC शी संपर्क तुटला" असे कॅप्टन केशरी सिंह यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलेय.

कॅप्टन केशरी सिंह
कोरोनाच्या बरोबरीने आता 'म्युकॉर्मीकॉसिस'चा आजाराचा धोका

त्यानंतर नागपूर ATC ने मुंबई ATC शी संपर्क साधला व सिंह यांच्याशी संपर्क साधला. "आतापर्यंतच्या माझ्या फ्लाईंग करीअरमध्ये मी कधीही उड्डाण करताना विमानाचं चाक निखळून पडल्याचं ऐकलं नव्हतं. ATC ने माझ्या कंपनीच्या मॅनेजर आणि इंजिनिअरशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही" असे सिंह यांनी सांगितले.

"रात्री ७.१० च्या सुमारास आम्हाला २७ नंबरच्या धावपपट्टीवरुन १०० मीटर उंचीवरुन उड्डाण करण्याची सूचना मिळाली, जेणेकरुन ग्राऊंड स्टाफला विमानाच्या नेमक्या स्थितीचा अंदाज येईल. त्यांनी आम्हाला डाव्या बाजूचं चाक नसल्याचं सांगितलं" असं कॅप्टन केशरी सिंह म्हणाले. "विमानात बसलेल्या कुटुंबाला आम्ही या प्रकारची माहिती दिली नाही. फक्त लँडिंगच्या दहा मिनिटं आधी मी डॉक्टरांना इमर्जन्सी लँडिंगसाठी तयार रहाण्यास सांगितले" असे केशरी सिंह म्हणाले. अखेर सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर कॅप्टन केशरी सिंह यांनी विमानाचे यशस्वीरित्या बेली लँडिंग केले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()