ब्राझीलच्या विनंतीनंतर ईडीची भारतात मोठी कारवाई; मुंबईचे सुद्धा आहे कनेक्शन...

ब्राझीलच्या विनंतीनंतर ईडीची भारतात मोठी कारवाई; मुंबईचे सुद्धा आहे कनेक्शन...
Updated on

मुंबई : ब्राझीलमध्ये काही व्यायवसायिकांनी मिळून त्यांच्या देशाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. या व्यावसायिकांविरोधात ब्राझीलने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली. त्या व्यावसायिकांची माहिती गोळा करताना त्यातील काही बँक खाती ही भारतात असल्याचे ब्राझील प्रशासनाला निदर्शनास आले. त्यानुसार ब्राझीलने भारताला त्याच्या देशातील 67 खाती ही गोठवण्याची विनंती केली होती.

ब्राझीलकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार भारतातील 67 संशयित खाती गोठवण्यात आली आहेत. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या मनी लाँडरींगप्रकरणी सुरू असलेल्या तपासाप्रकरणी ही विनंती करण्यात आली असून त्यातील काही खाती ही मुंबईशी संबंधित असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्याच्या हेतून काही वर्षांपूर्वी परस्पर करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने भारताना ब्राझीलच्या सांगण्यावरून त्यांच्या देशाची संबधित भारतात असलेली  67 खाती ही 'एजन्सी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'अंतर्गत ईडीने गोठवली आहेत. त्यातील काही खाती ही मुंबईशी संबंधित असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. त्यात कंपन्यांची व खासगी खात्यांचाही समावेश आहे.

भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांचे चांगले संबध आहे. कोरोना महामारीच्या काळात ही भारताने तब्बल 150 हून अधिक देशांना औषध आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. नुकतीच ब्राझीलमधील तपास यंत्रणांनी भारताला 67 खाती गोठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारताच्या ईडीने ती खाती गोठवली आहेत.
----
(संपादन : ऋषिराज तायडे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.