कालका-शिमल्यात धावणार परळ कार्यशाळेतील इंजिन, 12 इंजिन उभारणीचे ऑर्डर

कालका-शिमल्यात धावणार परळ कार्यशाळेतील इंजिन, 12 इंजिन उभारणीचे ऑर्डर
Updated on

मुंबई: उत्तर रेल्वेच्या कालका-शिमला रेल्वे विभागासाठी परळ कार्यशाळेने निर्मिती केलेले पाचवा झेडडीएम 3 नॅरो गेज इंजिनची निर्मिती केली आहे. उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागातील कालका - शिमला रेल्वे विभागातील प्रवासी आणि मालगाड्या चालविण्यासाठी या लोकोचा उपयोग केला जाणार आहे.

कालका - शिमला 2 फूट 6 इंचाची (762 मिमी) गेज रेल्वे आहे. जी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कालका ते हिमाचल पर्वत प्रांतातील शिमलापर्यंत चालते. उप-हिमालयी प्रदेशातून या रेल्वेचे जाळे असून, 97  किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावरून 1400 मीटर उंचीवर जाते. या रेल्वेला युनेस्कोचा जागतिक वारसा प्राप्त आहे.   

त्यासाठी 12 इंजिनची ऑर्डर परळ वर्कशॉपला देण्यात आली आहे. त्यापैकी आता 5 वे इंजिन तयार करून पाठवण्यात आले आहे. नोव्हेंबर 2019 पासून परळ वर्कशॉपमध्ये अशी चार इंजिने तयार करून पाठविण्यात आलेत. त्यासाठी लॉकडाऊन, अनलॉक कालावधी दरम्यान उत्पादित केलेला हा तिसरा इंजिन आहे. कोरोनाच्या काळातील संसर्गाची भीती असल्याने, प्रचलित लॉकडाऊन परिस्थितीमुळे सोशल डिस्टंसिंगच्या निकषांचे आणि मर्यादित स्त्रोतांचे पालन करत इंजिनांची निर्मिती केली गेली.
 
अधिक वाचाः  दिवाळीनंतरचे १५ दिवस अतिशय महत्त्वाचे; मुख्यमंत्र्यांकडून मास्क वापरण्याचं आवाहन

इंजिनची वैशिष्ट्ये

  • दोन्ही बाजूने चालविण्यासाठी व पुढे व्यवस्थित दिसण्यासाठी या इंजिनमध्ये दुहेरी कॅब प्रदान करण्यात  आली आहे.  
  • उत्तर भारतातील हिवाळ्यातील गंभीर परिस्थितीत काम करण्यासाठी इंजिन कोल्ड स्टार्टने सुसज्ज आहेत. 
  • आवश्यकतेनुसार इंजिन थंड करण्यासाठी ‘ऑन डिमांड कूलिंग सिस्टम’ ने देखील इंजिन सुसज्ज आहेत.
  • एअर ब्रेक्स ब्रॉडगेज इंजिन सारखेच आहेत.
  • डिझेल इंजिनच्या कार्यप्रदर्शनाची मापदंड इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर प्रदर्शित केली जातात.

इंजिनमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, सतर्कता नियंत्रण डिव्हाइस आणि रेकॉर्डरसह इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर सारख्या वैशिष्ट्यांसह सुरक्षितता  सुविधा देखील उपलब्ध आहेत.  त्यासोबतच एअर ब्रेक ट्रेलिंग लोडची भविष्यातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हेवी ड्युटी  कॉम्प्रेसर स्थापित करण्यात आलेले आहेत. दोन्ही ड्रायव्हर कॅबमध्ये हँड ब्रेक देखील  प्रदान केलेले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Engine from Parel workshop run in Kalka Shimla 12 engine orders received

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.