वाशी: फटाक्यांची पहाटे पासून सुरू झालेली आतषबाजी म्हणजे लक्ष्मी पूजनाचा जल्लोष, असे अनेक वर्षांचे समीकरण यंदा नवी मुंबईत बदलले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याने हे आशादायी चित्र पाहण्यास मिळाले.
अनेकांनी साधेपणाने लक्ष्मी पूजन केले. त्यासाठी घरासमोर सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार , आकाशकंदील, पणत्या, दीपमाळेचा झगमगाट असा उत्साही वातावरणात लक्ष्मी पूजनासाठी होते. घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात देवीच्या पूजेसह वह्या आणि खातेपुस्तिकांची मनोभावे पूजा पार पडली.
कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी अद्यापही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास नागरिक पुढे येत नाही. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या दिवशी दिवाळी पहाट चे कार्यक्रम झाले नाहीत.
सकाळी पूजाविधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. सर्वच उपनगरातील दुकानेही आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती.
दुकाने सजली
नवी मुंबईतील व्यापाय्ांनी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजविण्यास प्राधान्य दिले. दुकानांपुढे आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची पूजा पार पडली.
Enthusiasm for Lakshmi Puja continues at Navi Mumbai in corona period
=----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.