Mumbai News : मुंबईत गोवर हॉटस्पॉट गोवंडी परिसरात डब्ल्यूएचओची एंट्री

मुंबईत गोवरच्या उद्रेकाने डोक वर काढल्याने मुंबईवर संपूर्ण जगभरातून लक्ष केंद्रीत झाले आहे.
WHO
WHOSakal
Updated on
Summary

मुंबईत गोवरच्या उद्रेकाने डोक वर काढल्याने मुंबईवर संपूर्ण जगभरातून लक्ष केंद्रीत झाले आहे.

मुंबई - मुंबईत गोवरच्या उद्रेकाने डोक वर काढल्याने मुंबईवर संपूर्ण जगभरातून लक्ष केंद्रीत झाले आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये स्थानिक रहिवाशांचा लसीकरणाला असलेला विरोध पाहता मुंबई महापालिका विविध सामाजिक संघटनांसोबतच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ची मदत पालिकेकडून घेण्यात येत आहे. मुस्लिम धर्मगुरू तसेच विविध मशीदींशी जोडले गेलेले मौलाना यांची बैठक पालिकेच्या एम पूर्व विभागामार्फत घेण्यात येणार आहे. या बैठकीत लसीकरण मोहीमेसाठी आवाहन करण्यासाठी मौलवींकडून प्रतिसाद मिळवण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

एम पूर्व विभागात गोवरच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमध्ये जागतिक आरोग्य संघटना ( डब्ल्यूएचओ) ची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठीच डब्ल्यूएचओचे औरंगाबाद येथील लसीकरण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ मुजीब हे गोवंडीत स्थानिक पातळीवर मौलानांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीचा उद्देश हा मुस्लिम बहुल वस्तीमध्ये लसीकरणाच्या बाबतीत असलेले विविध गैरसमज तसेच गैरसमजुती दूर करणे असणार आहे. तसेच या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी मशीदीच्या मौलानांकडून नमाजच्या काळात लसीकरणाचे आवाहन करण्याचीही विनंती पालिकेने केली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीत असलेली भीती दूर होण्यासाठी मदत होईल. गोवरच्या निमित्ताने तसेच लसीकरणाच्या निमित्ताने असणाऱ्या चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी डॉ मुजीब यांची मदत होईल अशी माहिती पालिकेच्या एम ईस्ट विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ उपालीमित्र वाघमारे यांनी दिली.

एम पूर्व विभागात काम करणारे युनानी, होमिओपॅथी तसेच पेडिएट्रिशिअन यांचीही बैठक येत्या शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गोवरच्या रूग्णांचे थेट रिपोर्टिंग पालिकेकडे केले जावे असा उद्देश आहे. पालिकेच्या आवाहनानंतर अनेक खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी रूग्णांची माहिती पालिकेला देण्यासाठी सुरूवात केली आहे. स्थानिक पातळीवर रूग्णांचा शोध घेण्यासाठीही या खासगी डॉक्टरांची मदत घेऊन डब्ल्यूएचओ सर्वेक्षण करणार आहे.

गोवंडीतील रूग्णांची वाढती संख्या पाहता याठिकाणी इतर विभागातूनही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या एल, एम वेस्ट, एन आणि एस विभागातूनही कर्मचारी याठिकाणी सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या कामात जोडले गेले आहेत. एकुण ३०० कर्मचारी याठिकाणी अहोरात्र काम करत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी दिली. यामध्ये मलेरिया या कीटकनाशक विभागातील कर्मचार्यांच्या मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आता प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. एका बॅंकांनेही या गोवरच्या उद्रेकानंतर मदतीचा हात पुढे केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मौलानांना बैठकीला आवाहन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेकडून पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.