Mumbai : धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे 'एसआरए'च्या इमारतीत स्थलांतर करा; खासदार शेट्टींची मागणी

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई - जुन्या धोकादायक इमारती कोसळून अनेक लोक मृत्यमुखी पडल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. अशा घटनांची पूनरावृत्ती होवू नये यासाठी धोकादायक इमारतीत राहणा-यांना रहिवाशांना पालिकेच्या आणि एसआरएच्या रिकाम्या इमारतीत तात्पुरते स्थलांतर करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.

Mumbai
Ajit Pawar: पहिल्याच कॅबिनेटमध्ये मिठाचा खडा! शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई महापालिकेने दुरावस्था असलेल्या इमारतीना 354 कलमा अंतर्गत नोटीस बजावली असून नाईलाजाने काही लोक न्यायालयात धाव घेतात तर काही लोक स्थलांतरित होण्यास विरोध करतात. धोकादायक राहणारे लोक मध्यम वर्गीय आहे. मुलांच्या शाळा, स्वतःचा व्यवसाय, नोकरी जवळपास असल्याने घर सोडून दूर ठिकाणी जाणे त्यांना सोयीचे होत नाही, असे खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे.

Mumbai
Ajit Pawar: "परवानगीशिवाय माझा फोटो वापरु नयेत अन्यथा..."; शरद पवारांचा अजितदादा गटाला इशारा

मुंबई शहरात पालिका तसेच एस.आर.ए. मधील अनेक 180, 225 तसेच 269 चौरस फुटाची घरे गेली अनेक वर्षापासून रिकामी पडलेली आहेत तेथे धोकादायक इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करा अशी निर्देश पालिका आयुक्तांना तसेच एसआरएच्या अधिका-याना द्यावेत, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसे झाल्यास लोकांची जीव वाचविण्यास मदत होईल, असे खासदार शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.