बापरे! राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण, यामध्ये मुलींचं प्रमाण... 

बापरे! राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण, यामध्ये मुलींचं प्रमाण... 
Updated on

मुंबई : देशातील लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होते; त्यापैकी 72 टक्के मुली असतात, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (एनसीआरबी - नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो) 2018 मधील अहवालात देण्यात आली आहे. त्याबाबत क्राय (चिल्ड्रेन राईट्‌स अँड यू) संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. 

लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राबरोबर दिल्ली आणि बिहारमध्ये नोंदवण्यात आले. 2018 मध्ये अपहरणाच्या एकूण 10 हजार 117 घटना नोंदवण्यात आल्या असून, 2017 च्या तुलनेत 15.6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. अपहरण झालेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण तब्बल 72 टक्के आहे. त्यातही 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

राज्यात प्रोटेक्‍शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्‍शुअल ऑफेन्सेस (पॉक्‍सो) कायद्यांतर्गत सर्वाधिक म्हणजे 6233 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. लहान मुलांच्या खुनाच्या घटनेत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लहान मुलांच्या खुनाच्या घटनांत 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 23 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

मुलांबाबत घडणाऱ्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. असे गुन्हे नोंदवण्यासाठी नागरिक पुढे येत असल्याची बाब सकारात्मक आहे. अशा घटनांना बळी पडू शकणारी मुले आणि कुटुंबांची माहिती संकलित केली पाहिजे. लहान मुलांच्या संरक्षणासाठी सक्षम धोरणे आखून यंत्रणा तयार केली पाहिजे. 

- क्रिएन राबडी, प्रादेशिक संचालक, पश्‍चिम विभाग, क्राय 

बालकांचे अपहरण (2018) 

वय  मुलं  मुली  एकूण 
6-12 656 463 1119 
12-16 1328 2894 4222 
16-18 1002 4280 5282 
एकूण 2986 7637 10623 

चढता आलेख 

गुन्हे 2017 2018 वाढ 
अपहरण 8748 10117 15.6 %
"पॉक्‍सो' कायद्यांतर्गत 5248 6233 18.8 %
खून 145 179 23.4  %


everyday thirty children are kidnapped in maharashtra state is third on the list
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.