टूथब्रशपासून ते पीपीई किटचपर्यंत सगळ्या वस्तूंचे होणार बारकाईने ऑडीट; संबधित विभागांना कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश

टूथब्रशपासून ते पीपीई किटचपर्यंत सगळ्या वस्तूंचे होणार बारकाईने ऑडीट; संबधित विभागांना कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश
Updated on

मुंबई: कोव्हिड केंद्र विलगीकरण केंद्र उभराण्यापासून त्या केंद्रात पुरविण्यात आलेल्या बादल्या मग एवढेच काय पाण्याच्या बाटल्या, जेवण, टूथब्रश खरेदीचे ऑनलाईन लेखापरिक्षण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्याा दक्षता विभागाने सर्व संबंधित विभागांना छायाचित्रांसह  कागपत्र  तयार ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.

कोव्हिड प्रतिबंधापासून उपचारांसाठी महापालिकेने आता सुमारे 700 कोटी रुपये खर्च केले आहे.महाकाय कोव्हिड केंद्र विलगीकरण उभारण्या पासून कंत्राटी पध्दतीने डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वैद्यकिय साहित्य उपकरणे रुग्ण आणि संशयीत रुग्णांच्या दैनंदिन वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.या खरेदीत भ्रष्टाचार असल्याचा आरोप भाजपसह मनसेही करत आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी अशाच एका प्रकरणात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली असून त्यांनुसार लोकायुक्तांनी पालिकेकडे अहवालही मागवला आहे. महापालिकेच्या दक्षता विभागा मार्फत या सर्व खरेदीची तपासणी होणार आहे.त्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्र हवीत ती कशा पध्दतीने तयार करावीत, कोणती छायाचित्र हवीत याची यादीच संबंधित विभागांना पाठवली आहेय

ऑनलाईन तपासणीसाठी विशेष परवानगी 

दक्षता विभागाचे पथक संबंधिक कार्यालयाला प्रकल्पला भेट देऊन प्रत्यक्ष पडताळणी करते.मात्र,कोविडच्या साथीमुळे हे पथक कोविड केंद्रांसह इतर ठिकाणी भेटी देणार नाहीत. यासाठी विशेष परवानगी दिली आहे.असे दक्षता विभागााााने सर्व विभागांना जूलै महिन्याच्याा अखेरीस पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.सॅपच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येणार आहे.

यांचे होणार ऑडिट 

  • - विलगीकरण केेंद्र कोविड केंद्राची उभारणी,रुग्णालयात करण्यात आलेली विशेष तयारी 
  • - रुग्ण,संशयीत रुग्ण, विलगीकरण केलेल्या व्यक्तीसांठी विकत घेण्यात आलेले साहित्य यात बेड्स,टूथब्रश,बादली, मग या सह जेवण,नाष्टा पाण्याच्या बाटल्या अशा  सर्व साहित्य 
  • - पीपीई किट,ग्लोज गॉगल सर्जिकल गाऊन तसेच इतर वैद्यकिय साहित्य 
  • - ऑक्सिजन टॅंक पाईपलाईन, एसी तसेच इतर इलेक्टॉनिक साहित्य, भाड्याने घेतलेल्या रुग्णवाहीका, कंत्राटी कर्मचारी 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.