EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

EVM Tampering Case: रविंद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
EVM Tampering Case
EVM Tampering Caseesakal
Updated on

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मतमोजणी केंद्रात फोन वापरल्याने अडचणीत आले. याप्रकरणी पोलिसांनी वायकर यांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांनी 4 जून रोजी गोरेगाव येथील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेदरम्यान मतमोजणी केंद्रात फोन वापरला होता. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कलम 188 आणि  128 (2) लोकप्रतिनिधित्व अधिनियम सह 54 निवडणूक नियमांचे नियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

रविंद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

EVM Tampering Case
Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

मंगेश पांडिलकर हा फोन वापरत असल्याचे वनराई पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी ओटीपी जनरेट करण्यासाठी हा मोबाईल फोन वापरला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गौरव हा निवडणूक आयोगात एनकोर (पोल पोर्टल) ऑपरेटर होता. वनराई पोलिसांनी मंगेश पांडिलकर यांच्यासह निवडणूक आयोगाचे मतदान कर्मचारी दिनेश गौरव यांना CrPC 41A अंतर्गत नोटीस बजावली आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला. यापूर्वी या जागेवर कीर्तीकर यांना एका मताने विजयी घोषित करण्यात आले होते, मात्र फेरमतमोजणीत वायकर 48 मतांनी विजयी झाले. रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली आहेत. तर उद्धव गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली.

EVM Tampering Case
Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.