मुंबई : महापालिका आयुक्त पदावरुन नगरविकास विभागाच्या अपर मुख सचिव पदावर बदली झाल्यानंतर प्रविणसिंह परदेशी हे 14 दिवसांच्या सुटुटीवर गेले आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या वृत्तला दुजोरा मिळाला आहे.
प्रविण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल यांची बदली करण्यात आली आहे.चहल यांनी शुक्रवारी रात्री पालिका पदाचा पदभार स्विकारला ही. तर,परदेशी यांनी 14 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे.नव्या पदाचा पदभार स्विकारण्या पुर्वीच त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला आहे.
मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत नसताना धारावित सुरु असलेल्या लॉकडाऊनवर केंद्रीय पथकाने नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी केंद्रीय पथकाने धारावी येथे पाहाणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत बैठक घेतली होती. या बैठकिला परदेशी यांना बोलावण्यात आले नव्हते.
इकबाल सिंग चहल यांनी स्वीकारली पदाची सूत्र :
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. महानगरपालिकेचे मावळते आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्य सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर राज्य शासनाने नियुक्ती नांतर चहल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार चहल यांनी आज (दिनांक ८ मे २०२०) सायंकाळी महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.
ex mumai municipal corporation commissioner goes on 14 days leave before taking charge of new post
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.