पांडुरंग म्हस्के
मुंबई : सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यानंतर सर्वच ठिकाणी ‘एक्झिट पोल’चे (मतदानोत्तर चाचण्या) पेव फुटल्यासारखे चित्र तयार होत असते. अनेकदा हे अंदाज काही प्रमाणात खरे ठरत असतात. मात्र गेल्या वर्षात हे अंदाज सपशेल चुकू लागले आहेत. त्यामुळे या ‘एक्झिट पोल’बाबतच साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे.