Gajanan Kirtikar: "गजानन किर्तीकरांची पक्षातून हाकालपट्टी करा"; शिशिर शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्यानं वाद पेटला आहे.
Shishir Shinde_Gajanan Kirtikar
Shishir Shinde_Gajanan Kirtikar
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या जुन्या नेत्यांपैकी एक असलेले गजानन किर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत. पण त्यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्यानं शिवसेनेत अंतर्गत खळबळ माजली आहे. यापार्श्वभूमीवर गजानन किर्तीकर यांची पक्षातून हाकालपट्टी करा अशी मागणी शिंदेंच्या सेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे. (Expel Gajanan Kirtikar from Shivsena demanded by Shishir Shinde senior leader of Eknath Shinde Shivsena)

Shishir Shinde_Gajanan Kirtikar
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड! बाप-लेकाला कोर्टात हजर करणार, नव्याने गुन्हा दाखल

"ही कुठली आपसातली स्पर्धा नाही, किर्तीकरांना मी पदावरुन खाली खेचावं यासाठीची ही कृती नाही. तर पक्षात चांगलं वातावरण रहावं यासाठीची ही स्पर्धा आहे. आपल्या वक्तव्यानं आणि आपल्या कृतीनं पक्षाची कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, या भावनेनं मी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे," असं शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.

Shishir Shinde_Gajanan Kirtikar
Pune Porsche Accident: अल्पवयीन आहे म्हणून काय झालं? उत्तराखंडमधील एकाला जामीन नाकारला, पुण्यात वेगळा न्याय कशामुळे

हा विषय आजच संपूर्णपणे निकाली निघेल. पण जे चुकीचं आहे ते चुकीचचं आहे हे माझं शिवसैनिक म्हणून काम आहे. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, त्यांच्या भावनांना मी वाट करुन दिली. मी जनतेचा लाऊडस्पीकर आहे. पिता-पुत्रामध्ये मिठाचा खडा पडावा किंवा घरामध्ये भांडणं व्हावीत यासाठी सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही, शेवटी मुलालाही काही व्यक्ती स्वातंत्र असेल ना? वडिलांच्या भावना असतात त्यातून गजाभाऊ बोलले असतील पण हे सर्व पक्षाच्या मुळावर येऊ नये, हीच माझी इच्छा आहे, असंही शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.