रुग्ण संख्या कमी झाल्याने रायगड जिल्ह्यात कोरोना निर्बंधात 1 मार्चपासून शिथिलता देण्यात आली आहे.
अलिबाग - विनामास्क (Mask) फिरणाऱ्या व्यक्तींवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई (Crime) बंद करुन विनामास्क केसेस करण्यात येवू नयेत, असे पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले पत्र (Letter) समाजमाध्यमांव्दारे फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विनामास्क फिरणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व प्रकारामुळे रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा (Corona Infection) धोका वाढत असल्याने जिल्हाप्रशासानाने एक पत्रक प्रसिद्ध करून अशी कोणतीही कारवाई बंद केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रुग्ण संख्या कमी झाल्याने रायगड जिल्ह्यात कोरोना निर्बंधात 1 मार्चपासून शिथिलता देण्यात आली आहे. याच दरम्यान पोलीस अपर अधिक्षकांच्या नावे पत्र व्हायरल झाले होते. विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत,असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे. विनामास्क केसेस दंड करण्याबाबतचे 07 मार्च रोजीचे पत्र अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांनी 11 मार्च रोजीच्या पत्रान्वये मागे घेतले आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शासनाने कोविड अनुरुप वर्तनासंदर्भात दिलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.