मुंबई : मुंबई विद्यापीठाशी (Mumbai University) संलग्न असलेल्या सर्व वरिष्ठ स्वायत्त महाविद्यालयांच्या (Autonomous college) अंतिम परीक्षाही ऑफलाईन (offline) होत आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी (Degree exam) विद्यार्थ्यांना वाढीव वेळ दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सोईनुसार परीक्षांचे वेळापत्रक (exam timetable) तयार करावे, असेही प्राचार्यांना सांगण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये या परीक्षा होत असून त्या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. गेल्या वर्षभरात सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन झाला आहे. त्यात काही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन होत असून यंदा लेखी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. या परीक्षांचा पेपर पॅटर्न हा ऑनलाईन परीक्षांसारखा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास काही अडचणी येणार नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पदवी, पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे विद्यार्थी लेखी परीक्षांना सामोरे जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. विद्यापीठाकडून यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक परीक्षांसाठी ५० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येत होता. त्यात आता वाढ करून विद्यार्थ्यांना दोन तासांत परीक्षा द्यायची आहे. बहुपर्यायी प्रश्नांसह दीर्घोत्तरी प्रश्न असे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा सोप्या पद्धतीने देता येतील, असेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.