फडणवीसांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास; बोलले ते करून दाखवले, दरेकरांकडून कौतुक

फडणवीसांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास; बोलले ते करून दाखवले, दरेकरांकडून कौतुक
Updated on

मुंबईः बोलून दाखविल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना झाल्यावर पंचतारांकित रुग्णालयांकडे पाठ फिरवून सरकारी रुग्णालयातच उपचार घेतले. असे करून त्यांनी एकप्रकारे सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखविला, त्यांनी बोललेले करून दाखविले, असे प्रशंसोद्गार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काढलेत.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोनाकाळातील तसेच एकंदर कामे यांचा समावेश असलेल्या जनसेवक विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी दरेकर यांच्या हस्ते आणि भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच जनसेवक विशेषांकाचे अतिथी संपादक माधव भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. फडणवीस यांनी विरोधीपक्षनेते म्हणून राज्यभर आपदग्रस्तांना धीर देण्यासाठी केलेल्या दौऱ्यांचा अनुभवही यावेळी दरेकर यांनी यावेळी सांगितला. 

निसर्ग चक्रीवादळ असो, अतिवृष्टी असो किंवा कोरोनाप्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी असोत, फडणवीस यांनी प्रत्येक संकटप्रसंगात जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे फडणवीस हे देखील खऱ्या अर्थाने कोविडयोद्धे आणि जनसेवक आहेत. फडणवीस यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन प्रकाशित करण्यात आलेला जनसेवक हा विशेषांक पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारची यंत्रणा सर्वच स्तरावर अपयशी ठरत असताना फडणवीस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता राज्यातील कोविड सेंटरचा दौरा केला. ज्यावेळी प्रशासनाचे प्रमुख घरी बसले होते, तेव्हा फडणवीस यांनी संकटात सापडलेल्या जनतेला धीर दिला. निसर्ग चक्रीवादळ तसेच अतिवृष्टी या संकटसमयीदेखील ते प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्यांनी अविरत परिश्रम करून राज्यातील जनतेला धीर दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद घेणारा हा विशेषांक म्हणजे एका अर्थाने जनतेच्यावतीने त्यांच्या योगादनाप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता आहे, असेही दरेकर म्हणाले.

अन्य राजकीय नेते कोरोना झाल्यावर पंचातारांकित रुग्णालयात उपचार घेत असतानाच फडणवीस यांनी सेंट जॉर्ज या सरकारील रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. त्यांनी बोललेले करून दाखवले, एका प्रकारे त्यांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखविला असेही दरेकर यांनी दाखवून दिले.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Fadnavis believes government machinery Spoken and done appreciated by Pravin Darekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.