मुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर राऊतांनी फडणवीसांना दिले आहे. संजय राऊतांनंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेबाबतचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये. त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
बुधवारी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कार्यकारिणीच्या बैठकीतून भाजपच्या मिशन मुंबईची घोषणा करण्यात आली. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य फडणवीसांनी कार्यकारिणी बैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधताना केलं. फडणवीसांनी महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक मुद्द्यांवरून खडेबोल सुनावलेत. यामध्ये कोरोना, आरे मेट्रो, बुलेट ट्रेन , कोस्टल रॉड आदींचा समावेश होता.
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असल्यानं त्यांनी अशी भूमिका घेणं त्यांच्या पक्षासाठी बरोबरच आहे. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध असल्याचं जर भाजपला वाटत असेल तर त्याचा निर्णय जनताच घेईल. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई शहर आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा घाट सुरु असल्याचं म्हणत राऊत यांनी भाजपची सत्ता आल्यास हे नक्की होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईतील उद्योजकांना आपल्या राज्यात बोलावतात. याविरोधात भाजपचा एकही नेता बोलत नाही, पण शिवसेनेचे नेते बोलतात, असंही राऊत म्हणालेत.
Fadnavis dream will never come true NCP Jayant Patil Stroke Devendra Fadnavis
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.