ठाणे : कळपातून वाट चुकलेले हरिण मंगळवारी आनंदनगर परिसरात सैरावैरा पळत असतानाच सोसायटीच्या गेटमध्ये अडकले. त्यातच कुत्र्यांनी शरीराचे लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु होते, परंतू रात्री उशीरा त्याची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. अतिरक्तस्त्राव झाल्याने हरणाचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री ठाण्यातील आनंदनगर परिसरात कळपातून वाट चुकलेले दोन हरिण रेस्क्यु करण्यात आले होते. यातील एका हरिणाची मान सोसायटीच्या गेटमध्ये अडकली होती. त्यातच परिसरातील भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे वनविभागाने या हरिणाची सुटका करत प्रथम त्याला प्राथमिक उपचारासाठी एसपीसीए येथे हलवले. तेथून हरिणास बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आले होते.
हरिणाची प्रकृती नाजूकच होती, जखमांमधून अतिरक्तस्त्राव झाल्याने रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू ऑपरेशनमधील दुसऱ्या हरणाची प्रकृती उत्तम असून त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.