Fake Number plate crime
Fake Number plate crimesakal media

Mumbai Crime: कारच्या बनावट नंबरप्लेटची प्रकरणं उघड,१७ जणांवर गुन्हा

Published on

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata), अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या नावावर असलेल्या कारचा बनावट क्रमांक (Fake Car Number) वापरणाऱ्या गाड्या शहरात फिरत असल्याची प्रकरणं घडली असतानाच ई-चालानच्या (E Chalan) माध्यमांतून गेल्या सहा महिन्यात 241 बनावट नंबर प्लेटची (Fake Number Plate) प्रकरणं मुंबईत (Mumbai) उघड झाली आहेत. याप्रकरणी 17 जणांवर गुन्हाही दाखल (FIR) करण्यात आला आहे. ( Fake Car Numbers Case opens as Ratan Tata Sunny leone car number used- ns91)

प्रसिद्ध अभिनेत्री सन्नी लिओन हिच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर दुसराच कोणीतरी करत होता.त्यामुळे वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सन्नीला वाहतूक पोलीस शाखेकडून वारंवार ई-चलन पाठविण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात सन्नी यांच्यासारखी बीएमडब्ल्यू कार वर्सोवाच्या कोकीळाबेन वीरूभाई अंबानी रुग्णालयासमोर अच्युतराव पटवर्धन मार्गावर उभी दिसली. हे पाहिल्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांना घटनास्थळी बोलावले.एकाच रंगाच्या आणि हुबेहुब दिसणारी गाडी आणि नंबरही सारखाच असल्याचे पाहून पोलिस ही थबकले.

Fake Number plate crime
काळजी घ्या, पावसाळी आजार आणि कोरोनाची लक्षणे सारखीच! जाणून घ्या सविस्तर

त्यानुसार पोलिसांनी संबधित गाडी चालकाकडे गाडीची कागदपत्रे मागितली. तर दुसरीकडे सन्नीच्या पत्नीने त्यांच्या गाडीचे कागदपत्रे आणून पोलिसांना दाखवली. खरी खुरी गाडी कोणती याचा न्याय निवाडा लागल्यानंतर सन्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. उद्योगपती रतन टाटा यांनाही अशा घटनेचा सामना करावा लागला होता.वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी टाटा यांना वाहतूक पोलीस शाखेकडून ई चलन पाठविण्यात आले. त्यावेळी टाटा यांनाही आश्चर्य वाटले. नियम न मोडता ई-चलन आले कसे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. त्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली. रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर एक महिला आपल्या कारवर लावून चालवत होती. अभिनेत्री व उद्योगपती रतन टाटाप्रमाणे मुंबईत 241 बनावट नंबर प्लेटची प्रकरणी उघड झाली आहेत.

आपल्याला चुकून ई-चालान पाठवल्याच्या तक्रारी नागरीक वाहतुक पोलिसांकडे करतात. गेल्या सहा महिन्यात सुमारे 39 हजार 950 तक्रारी वाहतुक पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यांंच्या तपासणीत चार हजार 105 तक्रारींमध्ये चुकून ई-चालान पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकरणांची तपासणी करत असताना 241 बनावट नंबर प्लेटची प्रकरण उघड झाली आहेत. त्यातील 17 प्रकरणांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तपासणीत त्यातील तीनचोरीच्या गाड्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दोन प्रकरमांमध्ये नंबरप्लेट नोंदणीकृत नसल्याचेही उघड झाले आहे. तर उर्वरीत 12 प्रकरणांमध्ये बनावट नंबरप्लेटचा वापर झाल्याचे वाहतुक पोलिसांच्या तपासणीत समजले आहे. मुंबईत सरासरी 9 हजार वाहनांना दररोज ई-चालान पाठवण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()