नियम तोडून कोरोनाबाधित मृतदेहाला घातली आंघोळ, पुढे काय झालंय तुम्हीच वाचा...

नियम तोडून कोरोनाबाधित मृतदेहाला घातली आंघोळ, पुढे काय झालंय तुम्हीच वाचा...
Updated on

उल्हासनगर, ता,15 : मृतक व्यक्तीचा चाचणी रिपोर्ट येण्यापूर्वीच तो लेखी लिहून ताब्यात घेण्यात आल्यावर डॉक्टरांच्या सूचना पायदळी तुडवत या मृतदेहाला आंघोळ घालण्याचा प्रकार नातलगांच्या अंगलट आला आहे. मृत्यू पश्चात या इसमाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर घेण्यात आलेल्या स्वॅब कलेक्शन मध्ये या इसमाचे 9 नातलगांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.

प्रविण इंटरनॅशनल हॉटेलच्या आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या समोर वालधुनी नदीच्या शेजारी खन्ना कंपाऊंड आहे. येथे राहणाऱ्या एका इसमाचा 9 तारखेला आजारी असल्याने मृत्यू झाला होता. त्याच्या घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी होता. संशयित म्हणून तो मृतदेह शासकीय रुग्णालयाने पुर्णतः पॅक करून ठेवला होता.

मात्र आम्हाला मृतदेहावर अंतिम संस्कार करायचे आहेत अशी नातलगांनी विनंती केली असता, यात कोरोनाची लक्षणे आहेत, रिपोर्ट यायचा आहे असे डॉक्टरांनी सांगितले. नातलगांचा आग्रह वाढू लागताच मृतदेह उघडला जाणार नाही याची दक्षता घेण्यास तयार असल्यास लिहून द्या असे डॉक्टर म्हणाले. तेंव्हा नातलगांनी तसे डॉक्टरांना लेखी स्वरूपात लिहून दिल्यावर मृतदेह खन्ना कंपाऊंड मध्ये आणला. डॉक्टरांच्या सूचना पायदळी तुडवत मृतदेह उघडून आंघोळ घातली. अंतीमयात्रेतही 60 ते 70 जण सहभागी झाले.

तीन दिवसांपूर्वी या इसमाची मृत्यू पश्चात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्या 25 ते 30 नातलगांचे स्वॅब कलेक्शन घेण्यात आले होते. आज त्यापैकी 9 नातलगांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नातलगांना भावनेच्या भरात आंघोळ घालण्याचा प्रकार अंगलट आला असून त्यामुळे अंतिमयात्रेत सहभागी होणारे नागरिकही धास्तावून गेले आहेत.

यासंदर्भात मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता,मृतदेहाच्या घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी असताना कोरोना प्रादुर्भाव नियमानुसार नातलगांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्यावर त्यांच्याकडे तो सोपवण्यात आला होता.मृतदेह उघडायचा नाही, आंघोळ घालायची नाही, अंतीमयात्रेत सोशल डिस्टनिंग ठेऊन 10 जणांच्या वर सहभागी होण्याचे नाही. अशा सूचना देण्यात आल्या होत्या अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

दरम्यान आज उल्हासनगरातील 11 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यात खन्ना कंपाऊंड मधील 9 जणांचा समावेश आहे. त्यामुळे पॉझिटिव्हची आकडेवारी 92 च्या घरात गेली आहे.  सेंच्युरी कंपनी समोरील  कॅम्प नंबर 1 मधील एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू पश्चात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मृतकांची संख्या 5 झाली आहे.अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

"नातलगांवर एफआयआर दाखल होणार"

प्रत्येक गोष्टीचे खापर पालिका व पोलिसांवर फोडता येणार नाही. नातलगांनी अंडर टेकिंग लिहून दिल्यावर कोरोना नियमाप्रमाणे सर्व सूचना देऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता.मात्र त्यांनी नियम पायदळी तुडवल्याने 9 जण पॉझिटिव्ह आले असून अनेकांवर पॉझिटिव्हची टांगती तलवार आहे.ज्या नातलगांनी लेखी स्वरूपात लिहून देऊन मृतदेह ताब्यात घेऊन नियमांची अंमलबजावणी केली नाही अशांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना देण्यात आल्याचे सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

family of corona positive patients did not followed rules of hospital 9 family members detected positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.