हॅकर्सकडून कुटुंबाचे सर्व मोबाईल आणि लॅपटॉप हॅक करुन धमकावण्याचे प्रकार; तुमच्यासोबतही असं घडतंय का ?

हॅकर्सकडून कुटुंबाचे सर्व मोबाईल आणि लॅपटॉप हॅक करुन धमकावण्याचे प्रकार; तुमच्यासोबतही असं घडतंय का ?
Updated on

नवी मुंबई : अज्ञात हॅकरने नवी मुंबई लगतच्या कामोठ्यात राहणाऱ्या एका कुटुंबियांचे सर्व मोबाईल फोन व त्यांचे दोन लॅपटॉप हॅक करण्यात आले आहेत. त्याद्वारे त्यांच्या परीचयातील व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून सदर कुंटुंबाला शिविगाळ करण्याबरोबरच त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. विशेष म्हणजे या हॅकरकडून ऑनलाईन शिक्षण घेणाऱया सदर कुटुंबातील मुलींच्या शिक्षकांना सुद्धा गुगल मीट, जी सुट, झुम ऍपद्वारे धमकीचे मेसेज पाठवून या कुटुंबाची व त्यांच्या मुलींची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. कामोठे  पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात हॅकरविरोधात आयटी ऍक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार कामोठे सेक्टर-19 मध्ये कुटुंबासह वास्तव्यास असून अज्ञात हॅकरने त्यांचे तिन्ही मोबाईल फोन आणि घरातील दोन्ही लॅपटॉप हॅक केले आहेत. तसेच हॅक करण्यात आलेल्या मोबाईल फोनवरुन त्यांच्या संपर्कातील व्यक्तीना त्यांच्या नकळत मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. हॅकरकडून त्यांच्या घरातील तिन्ही मोबाईलवर एकमेकांना तसेच मोबाईलमधील व्हॉट्सऍप, झुम मिटींग आणि गुगल मीट यासारख्या ऍफ्लिकेशनवरुन कुत्रा, इडीयट या सारखे मेसेजेस पाठविले जात आहेत. विशेष म्हणजे तक्रारदारांच्या दोन्ही मुलींचे ऑनलाईन क्लासेस सुरु असताना देखील त्यांच्या शिक्षकांना व मित्र मैत्रिणींना  देखील घाणेरडे मसेजे पाठविले जात आहेत. त्यामुळे सध्या हे संपुर्ण कुटुंब त्रस्त झाले आहे.  

सुरुवातीला खबरदारीचा उपाय म्हणुन या कुटुंबाने सर्व मोबाईल फोन रिसेट मारले होते, तसेच फोनमधील सर्व अकाऊंट्सचे पासवर्ड बदलले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांच्या मोबाईलवरुन घाणेरडे मेसेज जाण्याचे प्रकार सुरुच राहिले. त्याचप्रमाणे गुगल मीट व झुम मिटींगच्या ऍफ्सवरुन तक्रारदाराच्या मुलींच्या शिक्षकांना पैशाची मागणी होऊ लागली. तसेच तक्रारदारांना शिवीगाळ करुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे सदर कुटुंब गेल्या काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

( संपादन - सुमित बागुल )

family in navi mumbai annoyed by hackers all mobiles and laptops are hacked case registered 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.