Mumbai Crime : प्रसिद्ध गोल्डन मॅनला पोलिसाकडून मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईतील एका लोकप्रिय 'गोल्डन मॅन' म्हणून ओळखला जाणारा गिरजेश गौडला पोलिसाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री नोंदवण्यात आली.
golden man girjesh gaud
golden man girjesh gaudsakal
Updated on

मुंबई - मुंबईतील एका लोकप्रिय 'गोल्डन मॅन' म्हणून ओळखला जाणारा गिरजेश गौडला पोलिसाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री नोंदवण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु पोलिसांकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.या घटनेने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून पोलीसाच्या वर्तनावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

'गोल्डन मॅन'ला मारहाण

मुंबईत 'द लिव्हिंग स्टॅच्यू' किंवा 'गोल्डन मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरजेश गौडला सोमवारी रात्री वांद्रे बँडस्टँडवर एका पोलीस हवालदाराने मारहाण धक्काबुक्की केली. गौडने स्वत: या घटनेचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे आणि या घटनेचा तपशीलही शेअर केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप गौडने केला आहे. व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी गौड यांच्याशी वादावादी करताना दिसत आहे. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिक तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत पोलीस कर्मचारी आणि गौडला एकमेकांपासून दूर नेण्यात आले.

पोलिसांचा पक्ष

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाकार गोल्डन मेन घटनास्थळी आल्याने त्याला पाहायला बघ्याची गर्दी जमत होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस हवालदार ड्युटीवर होता.गौडला अनेक वेळा गर्दी पांगवण्यासाठी घटनस्थळाहून जाण्याची पोलिसाने विनंती केली . मात्र विनंतीस नकार देत गौड तिथून गेला नाही.

त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि गिरीजेश गौडमध्ये वादावादी झाली. ज्याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. पोलीस कर्मचाऱ्यावर मद्याच्या नशेत वाद घातल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु मद्यपानाच्या आरोपांचे पोलीसांकडून खंडन करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.