Farmers Protest | 'दिल्लीतील हिंसा केंद्राचे षडयंत्र'; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप 

Farmers Protest | 'दिल्लीतील हिंसा केंद्राचे षडयंत्र'; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप 

Published on

मुंबई  : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशात वाढता पाठिंबा मिळत होता. त्यामुळे मोदी सरकारनेच जाणून-बुजून आंदोलनाला हिंसक वळण दिले. हिंसेचे हे सर्व षड्यंत्र मोदी सरकारचेच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar)  यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील आंदोलनाला जे हिंसक वळण लागले, त्यामध्ये संयुक्त किसान मोर्चातील कुणाचाही सहभाग नसून दीप सिंधू या नावाची व्यक्ती व काही बाह्य संघटनांनी आंदोलनाला हिंसक वळण दिले, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. दिल्लीत दोन महिन्यांपासून संयुक्त किसान मोर्चाचे शांततापुर्वक आंदोलन चालू आहे. दिल्लीतील आंदोलनात काही हिंसक लोक व दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप केंद्र सरकार करत आहे; मात्र प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा सरकारनेच घडवून आणली व हिंसेतही मोदी सरकारमधील काहींचा समावेश असेल, असे पाटकर म्हणाल्या. प्रजासत्ताक दिनी शांततापूर्व ट्रॅक्‍टर रॅली करणार होतो. या आंदोलनासाठी रामलीला मैदान मागितले होते; मात्र सरकारने जाणून-बुजून मुराडी मैदान दिले. दहा वेळेस चर्चा करूनही मोदी सरकार आम्हाला उत्तर देत नाही. आम्ही गांधीजींच्या विचाराने चालणारे लोक आहोत. आम्हाला हिंसा नको आहे, असेही पाटकर म्हणाल्या. 

आज सत्य सांगणार! 
मंत्रालयातील गांधी पुतळा येथे शेतकरी आंदोलनाशी संबंधित सर्व नेते शनिवारी (ता. 30) एकत्र जमुन भजन-कीर्तन, कथन व शांततेचा संदेश देऊन हिंसक आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नसल्याबाबत जनजागृती करणार आहे. तसेच, यावेळी दिल्लीतील हिंसेमागील सत्यता सांगणार आहोत, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.

--------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Farmers Protest Delhi Violence Center Conspiracy Serious allegations by Medha Patkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.