Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान

Liver Transfer: त्‍यांची गंभीर स्थिती आणि उपलब्‍ध उपचार पर्याय समजल्‍यानंतर श्रुतीने स्‍वेच्‍छेने तिचे यकृत दान करण्‍याचे ठरवले
Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान
Updated on

Mumbai : ‘फादर्स डे’ला मुले, विशेषत: मुली आपल्‍या वडिलांना शर्ट, घड्याळ यांसारख्‍या भेटवस्‍तू देतात; मात्र श्रुती परदेशी या मुलीने आपल्‍या वडिलांना भेट म्‍हणून आरोग्‍यदायी जीवन दिले. या २१ वर्षीय मुलीने तिच्‍या वडिलांसाठी यकृत दान केले.

फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील डिपार्टमेंट ऑफ लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अँड एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. गौरव गुप्‍ता आणि त्‍यांच्‍या टीमने यशस्‍वीरित्‍या प्रत्‍यारोपण केले.

Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान
Father’s Day 2024 : वडीलांवर असलेलं प्रेम व्यक्त करा, या शुभेच्छांनी त्यांचा दिवस स्पेशल बनवा

नाशिकमधील जितेंद्र परदेशी (वय ४५) तीन वर्षांपासून क्रोनिक लिव्‍हर डीसीज, हेपाटिक एन्‍सेफॅलोपॅथी (यकृताशी संबंधित ब्रेन डायस्‍फंक्‍शन), असाइटीस आणि मूत्रपिंड आजाराने पीडित होते. या आजारामुळे मागील वर्षी त्‍यांची तब्‍येत अधिक खालावली. त्यांना कावीळ, रक्‍ताच्‍या उलट्या झाल्‍या.

तसेच बल्‍ड थिनिंगमुळे (रक्‍त पातळ होणे) स्‍ट्रोकदेखील आला. त्‍यांच्‍या मुलीला त्‍यांची अशी अवस्‍था पाहणे सहन होत नव्‍हते. त्यामुळे वडिलांना लवकर बरे करण्‍याचा निर्धार करत श्रुतीने वडिलांना मुंबईत आणले. त्‍यांची गंभीर स्थिती आणि उपलब्‍ध उपचार पर्याय समजल्‍यानंतर श्रुतीने स्‍वेच्‍छेने तिचे यकृत दान करण्‍याचे ठरवले; मात्र शस्‍त्रक्रियेपूर्वी तपासणी करताना तिची शरीररचना वेगळी असल्‍याचे निदर्शनास आले.

सामान्‍यत: यकृताच्‍या उजव्‍या व डाव्‍या बाजूंना होणारा रक्‍तपुरवठा वेगवेगळा असतो, पण श्रुतीच्‍या बाबतीत तिच्‍या यकृताच्‍या डाव्‍या बाजूला उजव्‍या बाजूकडील रक्‍तवाहिन्‍यांमधून अंशत: रक्‍तपुरवठा होत होता.

Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान
Fathers Day 2024 : फादर्स डे साजरा करण्यासाठी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारचीच निवड का करण्यात आली?

त्यामुळे प्रत्‍यारोपणासाठी तिच्‍या यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा उपयोग केल्‍यास यकृताच्‍या डाव्‍या बाजूवर परिणाम होऊ शकतो. यामुळे डॉक्‍टरांनी प्रत्‍यारोपणासाठी तिच्‍या यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा (राइट पोस्‍टेरिअर सेक्‍टर ग्राफ्ट) फक्‍त अर्धा भाग वापरण्‍याचे ठरवले.

आम्‍हाला या केसमध्‍ये दोन आव्‍हानांचा सामना करावा लागला. मुलीची अद्वितीय शरीररचना, ज्‍यामुळे आम्‍ही राइट पोस्‍टेरिअर सेगमेंट ग्राफ्ट प्रक्रिया केली, जी क्‍वचितच केली जाते. या प्रकारच्‍या दात्‍याच्‍या शस्‍त्रक्रियेत यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा भाग (यकृताचा ६० ते ६५ टक्‍के भाग) घेण्‍याऐवजी आम्‍ही यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा अर्धा भाग (यकृताच्‍या जवळपास ३० ते ३५ टक्‍के) घेतो. यामुळे दात्‍याची शस्‍त्रक्रिया आव्‍हानात्‍मक असते.

Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान
Fathers Day 2024 : वडिलांचे वय ५० च्या वर असेल, तर हे पदार्थ त्यांच्या डाएटमध्ये असणं अत्यावश्यक

दुसरे आव्‍हान म्‍हणजे, प्राप्‍तकर्ता रुग्णाने अशा लहान यकृताला प्रतिसाद देणे, ज्‍यात गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. सामान्‍यत: प्राप्‍तकर्ता रुग्‍णाला जगण्‍यासाठी जवळपास ५०० ते ६०० ग्रॅम वजनाच्‍या यकृताची गरज असते. या केसमध्‍ये आम्‍ही रुग्‍णाला फक्‍त ३७० ग्रॅम वजनाचे यकृत देऊ शकलो, जे वजनाने खूप कमी होते, पण आम्‍ही आव्‍हानांवर मात केली आणि शस्‍त्रक्रिया यशस्‍वी ठरली. आता दोघांचीही प्रकृती ठीक असून ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

- डॉ. गौरव गुप्‍ता, संचालक, डिपार्टमेंट ऑफ लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अँड एचपीबी सर्जरी

Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान
Father’s Day 2024 : वडिलांसोबतच्या नात्यात गोडवा वाढवायचाय? मग, फादर्स डे निमित्त बनवा ‘हे’ खास पदार्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.