लोकांच्या मनातील कोरोनाची भीती होतेय कमी, होय 'हे' आता सिद्ध झालंय...

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती होतेय कमी, होय 'हे' आता सिद्ध झालंय...
Updated on

मुंबई : मुंबईतील एकूण ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांपैकी 10,366 मुंबईकर हे सध्या होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. तर 9,771 रुग्ण हे विविध रुग्णांलयात उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे असलेले 2,691 रुग्णांना मुंबईतील जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत एकूण 22,828 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील 45 टक्के लोकांनी घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्णालयांतील वातावरणाबाबत साशंकता

अंधेरी मध्ये वास्तव्यास असणाऱ्या कोरोना बाधित दाम्पत्याने ही रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेणे पसंत केले. रुग्णालयांतील वातावरणाबाबत साशंकता असून मनात थोडी भीती असल्याचे ते सांगतात. शिवाय आम्हा दोघांना ही वेगवेगळे राहायचे नसल्याने आम्ही होम क्वारंटाईन होण्याचे ठरवले असे ही त्यांनी पुढे सांगितले. अश्या प्रकारे अधिकतर रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे समोर आले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थेत काम करणारे हे दाम्पत्य असून त्यांना कामानिमित्त नेहमी घराबाहेर जावे लागत होते. त्यामूळे कोरोनाची बाधा होण्याची शक्यता त्यांनाही वाटत होती. त्यामुळे त्यांनी एप्रिलमध्ये प्लस ऑक्सिमिटर, थर्मामिटर, बीपी मॉनेटरिंग मशीन विकत घेतल्याचे ही ते सांगतात.

व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क

तीन आठवड्यांपूर्वी हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर सुरुवातीचे तीन दिवर सतत ते आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासात असल्याचे सांगतात. त्यांची लक्षणे ही सौम्य प्रकारची होती. आठवड्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन त्यांना पूर्वीपेक्षा बरे वाटू लागले. त्यादरम्यान त्यांनी व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क सुरू ठेवला होता.

लोकांच्या मनातील भीती होतेय कमी : 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अधिकतर रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे कोरोना बाबतची लोकांच्या मनातील भीती हळूहळू कमी होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या काही आठवड्यांंपासून स्लॅम वगळता इमारतींमधील बाधित रुग्णांची संख्या वाढत असून होमकेअरची संख्या देखील वाढत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जेव्हा मुंबईतील  बाधित रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला होता त्यावेळी त्यात स्लममधील रुग्णांची संख्या अधिक होती. आता मात्र परिस्थिती बदलली असून आता हायराईज विभागातील रुग्णसंख्या वाढली असून सुरुवातीला देखील अशीच परिस्थिती बघायला मिळत असल्याचे मत प्रशासकीय अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी नोंदवले. अशा रुग्णांकडे स्वतःला आपल्या घरीच आयसोलेट करणे शक्य असल्याने ते हा पर्याय स्वीकारत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

समुपदेशन करण्यावर भर : 

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती अत्यंत कठीण होती. लोकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीसारख्या समस्या जाणवत होत्या. लोकांकडुन अशा प्रकारच्या खूप तक्रारी येत होत्या. अशा लोकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात आल्याचे ग्रांट मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ हेमंत गुप्ता यानी सांगितले. काही रुग्ण दिवसांतून 50 वेळा आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासतात. जर एखाद्या व्यक्तीला सतत ताप आणि खोकला असेल तर अश्यांना एक्स रे काढण्याचा सल्ला देत असल्याचे ही ते सांगतात. त्यांनी आतापर्यंत 50 रुग्णांवर घरच्या घरी उपचार केल्याचे ही त्यांनी सांगितले. मात्र लोकांनी घाबरून न जाता आपल्या लक्षणांवर लक्ष ठेवावे तसेच काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास ही ते सुचवतात.

दुर्लक्ष न करता 'ही' धोक्याची घंटा समजावी

सध्या पावसाळा सुरू असून प्रत्येकाने आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. अंगातील ताप 5/6 दिवस कमी होत नसेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल,शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर याकडे दुर्लक्ष न करता ही धोक्याची घंटा समजावी. अशी लक्षणे तरुणांमध्ये शिवाय दीर्घकालीन आजार नसलेल्या व्यक्तींमध्येही असू शकतात. अशी लक्षणे असल्यास दोन आठवड्यात ती अधिक गंभीर होण्याचा धोका उद्भवू शकतो. दिर्घकाली आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना काही लक्षणे जाणवल्यास त्यांनी ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार करणे महत्वाचे असून त्यांना त्याबाबत सल्ला देण्यात येत असल्याचे डॉ गुप्ता यांनी सांगितले.

( संकलन  - सुमित बागुल ) 

fear of corona has decreased because 45 percent covid patients are taking treatment at home

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.