Mumbai News : भांडुपमध्ये दरड कोसळण्याची भीती कायम!

माळीण गाव किंवा इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची भीती नागरिकांच्या मनात.
fear of landslide in bhandup
fear of landslide in bhandupSakal
Updated on

Mumbai : भांडुप येथील खिंडी पाडा परिसरात ४०० ते ४५० घरे आहेत; तर रावते कपाउंड, हनुमान टेकडी, रमाबाई नगर, गावदेवी टेकडीसह नगरदास परिसरात १० हजार घरे आहेत. या परिसरातील शेकडो घरे दगड खाणीत बांधली आहेत. रमाबाई नगरजवळील संरक्षक भिंत जीर्ण झाली आहे. मोरोडो हिलजवळ संरक्षक भिंतीचे बांधकाम अर्धवट आहे.

त्यामुळे येथे माळीण गाव किंवा इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे. या भागात अनेक ठिकाणी संरक्षक भिंत बांधलेली नाही; तर काही ठिकाणी बांधली, मात्र ती अपूर्ण आहे.

पावसाळ्यात येथील रहिवाशांना केवळ नोटिसा येतात. कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात प्रशासनाला रस नाही. घटना घडली की प्रशासन केवळ सांत्वन करण्यास येते.

- पवन कुमार बोराडे, सामाजिक कार्यकर्ते

गेल्या आठवडाभरापासून आम्ही दरडीच्या भीतीने रात्र जागून काढत आहोत. कामावर गेले तरी घरीच जीव गुंतून राहतो. कामावरून घरी आल्यावर रात्रभर जागावे लागते. जगावे की मरावे हे कळत नाही.

- कुंडलिक खरात, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.