सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर नरकातून स्वर्गात आल्यासारखे वाटले. असे एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या वसईतील ऐश्वर्या गोविंद राठोड हिने युद्धप्रसंगी घेतलेला अनुभव कथित केला.
वसई - अचानक युद्ध (War) सुरु झाले, बॉम्बहल्ले, (Bomb Attack) कानठळ्या बसविणारे आवाज दहशतीचे (Panic) सावट सीमेवर (Border) पोहचण्यासाठी चालून-चालून अद्यापही पायही सुजले आहेत अशी बिकट अस्वथा झाली. त्यामुळे सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर नरकातून स्वर्गात आल्यासारखे वाटले. असे एमबीबीएसचे शिक्षण (MBBS Education) घेण्यासाठी युक्रेनला (Ukraine) गेलेल्या वसईतील ऐश्वर्या गोविंद राठोड (Aishwarya Rathod) हिने युद्धप्रसंगी घेतलेला अनुभव कथित केला.
ऐश्वर्या ही विन्तीन्सिया येथील नॅशनल प्यूरोगवा महाविद्यालयात एमएमबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. याचठिकाणी हॉस्टेलमध्ये राहत होती. वसईच्या वसंतनगरी एव्हरेस्ट टॉवर याठिकाणी ऐश्वर्याचे कुटूंब आहे आई, वडील, आजी, आजोबा, दोन भाऊ आहेत. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर घरातील सदस्य चिंतेत होते. तिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. भाजपच्या प्रदेश सचिव आम्रपाली साळवे यांच्याशी संपर्क करण्यात आला. सूत्रे हलवली गेली रशियाची विमाने घिरट्या घालत होते.
आवाज, महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या अंतरावर देखील हल्ले झाले, यातना सहन कराव्या लागल्या. त्यातच भारतातील काही विद्यार्थी एकत्र बस करून शहर सोडण्याचा निर्धार केला आणि प्रवास सुरु झाला. स्वच्छतागृहाची साधने नसल्याने पाणी पिणे देखील टाळण्यात आले, खाण्यासाठी केवळ वेफर्स, काही फळं इतकंच होते. भूक देखील मेली होती. कधी भारतात जातो याच विचाराने पछाडलं व दुपारचा हा प्रवास त्यात त्यांना अडवले गेले. मात्र, भारताचा झेंडा सोबत ठेवला होता. त्यामुळे विद्यार्थी असल्याने सोडण्यात आले. रात्रीच्या सुमारास चमव्ह्यू सीमा त्यानंतर रूमानिया सीमेपर्यंत खांद्यावर वजनी बॅगा घेऊन 15 किमी प्रवास केला. त्यानंतर भारत सरकारच्या सुरक्षा पथकांना संपर्क केला त्यांना जेवणाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली व सुटकेचा श्वास घेतला.
सी - 17 या विमानाने अखेर ऐश्वर्या भारतात आली. तिची व कुटूंबियांची भेट घेतली त्यावेळी आनंदाश्रू आले. हा प्रवास तिच्यासाठी भयानक होता. कधी भारतात येते
15 तास प्रवास, 10 किमी चालत सीमा गाठली
महाविद्यालयापासून बसने प्रवास केला तरी पुढे चालत जावं लागले. दुपारी अडीचच्या सुमारास हे विद्यार्थी निघाले त्यांना पोहचण्यासाठी सुमारे 15 तास लागले. त्यात रूमालीया सीमा गाठण्यासाठी 10 किमी चालावे लागले. यावेळी डोळ्यावरून विमाने जात होती. आवाजाने सतत भीतीचे वातावरण आणि काळ्याकुट्ट अंधारातून जंगलाचा प्रवास अत्यंत भयावह होता.
ऐश्वर्या युक्रेनला असताना सुरु झालेल्या युंद्धामुळे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली होते. संपर्क कधी होत होता तर काही वेळेस नाही. भीती निर्माण होत होती, युक्रेन सीमेवर आल्यावर भारतीय मदत मिळाली ऐश्वर्या घरी सुखरूप आली. याचा आनंद आहे.
- गोविंद राठोड, ऐश्वर्याचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.